Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील 'या' राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा निर्णय

राज्यातील 'या' राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष होणार, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात मोठा निर्णय


महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे आणि सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करणे या प्रमुख मागणीसाठी पाठपुरावा सुरू आहे.

यासाठी संबंधितांच्या माध्यमातून शासनाकडे वेळोवेळी निवेदने दिली जात आहेत. काही प्रसंगी आंदोलनाचा देखील पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला होता.  दरम्यान या साऱ्या पार्श्वभूमीवर आज अर्थातच 5 फेब्रुवारी 2024 ला शिंदे-फडणवीस-पवार सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारने आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. याशिवाय देशातील जवळपास 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अर्थातच रिटायरमेंट एज 60 वर्षे एवढे आहे

विशेष बाब अशी की, महाराष्ट्रातील ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे वय देखील 60 वर्षे करण्यात आले आहे. परंतु राज्यातील अ, ब आणि क संवर्गात कार्यरत असलेल्या नोकरदार मंडळीचे सेवानिवृत्तीचे वय अजूनही 58 वर्षे एवढे आहे. यामुळे या सदर नोकरदार मंडळीला आणखी दोन वर्षांची वाढीव सेवा मिळावी अर्थात सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे व्हावे ही मागणी केली जात आहे. 

दरम्यान आज शिंदे सरकारने राज्यातील कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अर्थातच राज्यातील सर्वच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात आलेले नाही.  मात्र कृषी कृषी विभागाअंतर्गत येणाऱ्या कृषी विद्यापीठात कार्यरत असलेल्या शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्षे एवढे होणार आहे. त्यामुळे या संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आता व्यक्त होत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.