Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास

भाजपच्या खासदार रीता बहुगुणा जोशी यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास



2012 च्या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन प्रकरणात भाजपच्या खासदार डॉ. रीता बहुगुणा जोशी या दोषी ठरल्या आहेत. त्यामुळे खासदार/आमदार न्यायालयाच्या विशेष दंडाधिकारी अंबरीश कुमार श्रीवास्तव यांनी जोशी यांना 6 महिन्यांचा तुरुंगवासासह 1100 रुपये दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे.

2012 च्या निवडणुकीत डॉ. जोशी या काँग्रेसच्या उमेदवार होत्या. फिर्यादीच्या वतीने सहसंचालक वेदप्रकाश त्रिपाठी यांनी सांगितले की, हा खटला निवडणुकीचे स्टॅटिक सर्व्हिलन्स मॅजिस्ट्रेट मुकेश चतुर्वेदी यांनी नोंदवला होता.खटल्यानुसार, रिटा बहुगुणा जोशी या कँट विधानसभा मतदारसंघातून उमेदवार होत्या. 17 फेब्रुवारी 2012 रोजी सायंकाळी 6.50 च्या सुमारास कृष्णानगर येथील बजरंग नगर भागात त्या एका जाहीर सभेला संबोधित करत होत्या. निगराणी दंडाधिकाऱ्यांनी याचा व्हिडिओ बनवून कृष्णनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

पोलिसांनी तपासादरम्यान 12सप्टेंबर 2012 रोजी रिटा बहुगुणा जोशी यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. 20 फेब्रुवारी 2021 रोजी न्यायालयाने त्याच्यावर आरोप निश्चित केले होते. न्यायालयाने त्यांना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 126 अन्वये 6 महिने तुरुंगवास आणि 1000 रुपये दंड आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार 100 रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा सुनावणी दरम्यान न्यायालयाने रिटा बहुगुणा जोशी यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांच्याकडून देण्यात आलेला जामीन अर्ज स्वीकारून न्यायालयाने 20 हजार रुपयांचा बॉण्डपेपर आणि तेवढीच जामीन रक्कम भरून अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश दिले. जामीन न मिळाल्याने न्यायालयाने बाँड स्वीकारून अपील दाखल होईपर्यंत त्यांची सुटका केली आहे.

रीता बहुगुणा जोशी 2012 साली विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होत्या. स्टेटीक मॅजिस्ट्रेट मुकेश चतुर्वेदी यांनी 17 फेब्रुवारी 2012 रोजी कृष्णा नगर पोलीस स्थानाकात रीता जोशी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत मोहल्ला बजरंग नगर मध्ये काँग्रेसच्या उमेदवार रीता बहुगुणा जोशी यांच्या प्रचाराची वेळ होऊनही त्या सभा घेत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. पोलिसांनी तपास पूर्ण करुन रीता बहुगुणा जोशी, प्रभा श्रीवास्तव , राम सिंह, शकील अहमद, संजय यादव आणि मनोज चौरसिया यांच्या विरुद्ध 17 जून 2012 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान आरोपी शकील अहमद याचा मृत्यू झाला होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.