अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन; वयाच्या 59 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ऋतुराज सिंह यांचे जवळचे मित्र अमित बहल यांनी ऋतुराज सिंह यांच्या निधनाची माहिती दिली आहे.त्यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्याने ऋतुराज यांचे निधन झाले. स्वादुपिंडाशी संबंधित समस्या देखील ऋतुराज सिंह यांना जाणवत होत्या.
जाणून घ्या ऋतुराज सिंह यांच्याबद्दल...
ऋतुराज सिंह यांनी दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण केले. ऋतुराज सिंह यांनी 12 वर्षे बॅरी जॉन्स थिएटर ॲक्शन ग्रुप सोबत दिल्लीत थिएटरमध्ये काम केले. ते 1993 मध्ये मुंबईत आले. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ऋतुराज सिंह यांचे पूर्ण नाव ऋतुराज सिंह चंद्रवत सिसोदिया होते. त्यांचा जन्म राजस्थानमधील कोटा येथील सिसोदिया राजपूत कुटुंबात झाला.
ऋतुराज सिंह यांनी 'या' मालिकांमध्ये केलंय काम
रिश्ता क्या कहलाता है, होगी अपनी बात, ज्योती, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट और अदालत, दिया और बाती हम यांसारख्या अनेक शोमध्ये ऋतुराज सिंह यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
ऋतुराज सिंह यांचे चित्रपट
रितु आशिकी,मेरी आवाज ही पहचान है, तड़प, बद्रीनाथ की दुलहनिया, सत्यमेव जयते या चित्रपटांमध्ये ऋतुराज सिंह यांनी महत्वाची भूमिका साकारली आहेत. तसेच शाहरुख खानच्या डर आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये देखील ऋतुराज सिंहनं काम केलं आहे. ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर आता त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. ऋतुराज सिंह यांच्या निधनानंतर मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.