Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक ! फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी ठेवलं 50 पैशांचं बक्षीस

धक्कादायक ! फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी ठेवलं 50 पैशांचं बक्षीस


फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेकदा मोठमोठ्या रकमेची बक्षिसं जाहीर केली जातात, त्याबद्दल आपण ऐकलं आहे. मात्र राजस्थान पोलिसांनी एका फरार गुन्हेगारावर फक्त 50 पैसे इनाम घोषित केलं आहे. साहजिकच हा चर्चेचा विषय बनला आहे. गुन्हेगाराची माहिती देण्यासाठी किंवा त्याला पकडून देण्यासाठी मोठं इनाम जाहीर केल्यावर त्या गुन्हेगारांकडून त्या इनाम रकमेची माहिती देऊन स्वतःचा दबदबा किती आहे, हे सोशल मीडियावर व्हायरल केलं जातं. या पार्श्वभूमीवर, अशा बदमाश गुन्हेगारांना स्वतःची लायकी दाखवण्यासाठी पोलीस अधीक्षक देवेंद्र कुमार बिश्नोई यांनी 50 पैसे इनाम जाहीर करण्याची क्लृप्ती काढली आहे. आपल्याला पकडण्यासाठी जाहीर झालेल्या इनाम रकमेवरून गुन्हेगारांनी स्वतःला डॉन समजू नये, यासाठी पोलिसांनी ही क्लृप्ती काढली आहे.

फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलीस 500 रुपयांपासून अगदी लाखभर रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचं इनाम जाहीर करत असतात; मात्र या इनाम रकमेचा उपयोग आरोपींना पकडण्यासाठी कधीच झाला नाही, असं लक्षात आलं. उलट, गुन्हेगार स्वतःवर लावलेल्या या इनाम रकमेचा वापर करून सोशल मीडियावर स्वतःचा रुबाब किती आहे, हे व्हायरल करतात.

देवेंद्र बिश्नोई म्हणाले, की इनाम रकमेचा गुन्हेगारांना पकडण्यासाठी कधीही उपयोग होत नाही. पोलिसांच्या खबऱ्यांचं तंत्र बदमाशांना पकडण्यासाठी उपयोगी ठरतं; मात्र बदमाश त्या आधारे स्वतःचा रुबाब किती आहे, हे दाखवण्यात यशस्वी होतात. त्यामुळे या बदमाशांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी 50 पैसे इनाम रक्कम जाहीर करायला सुरुवात केली. त्यांची लायकी 50 पैशांएवढीच आहे, असा संदेश त्यातून जातो.

50 पैसे इनाम ठेवल्याने त्याचा गुन्हेगारांना स्वतःचा दबदबा तयार करण्यासाठी उपयोग होणार नाही. समाजातही संदेश जातो, की गुन्हेगारांची लायकी नाही. समाजाने निर्भयतेने पोलिसांना मदत करावी आणि बदमाशांना पकडण्यासाठी मदत करावी, असं आवाहन करण्यात आलं.

झुंझुनू एसपी देवेंद्रकुमार बिश्नोई म्हणतात, की इनाम मिळवण्यासाठी कोणीही व्यक्ती बदमाश गुन्हेगारांना पकडण्यास मदत करत नाही. म्हणून पोलिसांनी गुन्हेगारांचं मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आणि त्यांची लायकी दर्शवण्यासाठी या प्रकारचे आदेश लागू केले आहेत. गुन्हेगारांचं महिमामंडन होता कामा नये. अपराधमुक्त समाजाचा संदेश यातून द्यायचा आहे.

सिंघाना पोलीस ठाण्याला हव्या असलेल्या योगेश या गुन्हेगारावर 50 पैशांचं इनाम जाहीर करण्यात आलं आहे. तो सिलारपुरी गावातला असून, आर्म्स अॅक्टसंदर्भातल्या प्रकरणात फरार आहे. हा आदेश जाहीर झाल्यावर सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर बरीच चर्चा सुरू आहे. एकाने लिहिलं आहे, की राजस्थानात अशा बदमाशांची लायकी केवळ 50 पैशांची आहे, तर कोणी लिहिलं आहे, की राजस्थानात आता दोन चार आण्याचे गुन्हेगार राहिले आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.