मनपा क्षेत्रात 4143 विद्यार्थ्यानी दिली शिष्यवृत्ती परीक्षा
शासनाच्या राज्य परीक्षा परीषदेच्या पुर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5वी ) आणि पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (8वी) काल रविवारी सांगली महापालिका क्षेत्रात उत्साहात झाली. पालक आपल्या पाल्याला शाळेच्या प्रांगणात सुचना देताना दिसत होते. शांतपणे पेपर वाच...खाडाखोड करू नको...अशा सुचना सुरु होत्या.
पालक तणावात....विद्यार्थी उत्साहात... हा सिन होता
या परीक्षेची सर्व तयारी महापालिका शिक्षण विभागाकडून करण्यात आली होती. सांगली महापालिका क्षेत्रात इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ११ केंद्रावर आणि 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 9 केंद्रावर झाली.यात इयता पाचवीसाठी 2680 विद्यार्थ्यापैकी 2594 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.तर 86 विद्यार्थी अनुपस्थित होते. इयत्ता आठवीसाठी 1627 विद्यार्थ्यांपैकी 1549 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर 78 विद्यार्थी गैरहजर होते.
महापालिकेचे आयुक्त सुनिल पवार,उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाच्या प्रशासनअधिकारी रंगराव आठवले ,लेखाधिकारी गजानन बुचडे यांच्या नियंत्रणाखाली सर्व केंद्रसमन्वयक ,कार्यालयीन कर्मचारी तसेच २०परीक्षाकेंद्रावरील 20 केंदसंचालक ,शिक्षक असे 260 जणांनी या सर्व शिष्यवृत्ती परीक्षेचे नियंत्रण केले होते. उप आयुक्त स्मूर्ती पाटील राहुल रोकडे सहा आयुक्त अनिस मुल्ला आणि जन संपर्क अधिकारी धनंजय हर्षद यांनी केंद्रांना अचानकपणे भेटी दिल्या आहेत .सर्व केंद्रावर चांगली व्यवस्था केली होती.
इयत्ता पाचवी,आठवीसाठी सकाळी 11 ते 12.30 यावेळेत प्रथम भाषा, गणित हे पेपर तर दुपारी 2 ते 3.30 यावेळेत तृतीयभाषा,बुध्दिमता चाचणी हे पेपर होते. इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आरपी पाटील हायस्कूल,कुपवाड , न्यू इंग्लिश स्कूल मिरज,सांगली हायस्कूल,सांगली,कांतीलाल पुरुषोत्तम शहा, सांगली, विद्यामंदिर प्रशाला,मिरज ,आदर्श शिक्षण मंदिर किल्ला परीसर,मिरज , मिरज हायस्कूल,मिरज , दामाणी हायस्कूल,सांगली , सिटी हायस्कूल,सांगली , आप्पासाहेब बिरनाळे पब्लिक स्कूल सांगली ,एम.ए.उर्दू हायस्कूल तर इयत्ता 8वीसाठी परीक्षा आ.आ.उपाध्ये गर्ल्स हायस्कूल, कुपवाड,अल्फोन्सा, मिरज, आदर्श शिक्षण मंदिर,, ज्युबिली कन्या शाळा, मिरज, मालू हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, पुरोहित कन्या शाळा,राणी सरस्वती कन्या शाळा, दडगे गर्ल्स हायस्कूल येथे शिष्यवृती परीक्षा झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.