Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सारखी लघवी होणं 'या' 4 गंभीर आजारांचं असू शकतं लक्षण, दुर्लक्ष नको, करा असे उपाय

सारखी लघवी होणं 'या' 4 गंभीर आजारांचं असू शकतं लक्षण, दुर्लक्ष नको, करा असे उपाय


ही लोकांना सारखी लघवीला होत असल्याने ते यामुळे त्रस्त असतात. काहींना जास्त पाणी प्यायल्याने तर काहींना वय वाढल्याने अशी समस्या जाणवू शकते. सारखी लघवीला होणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण नाही, ही समस्या म्हणजे 4 गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते. तेव्हा याकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं.

सारखी लघवी होण्याची कारण : 

डायबेटिज : वारंवार लघवीला होणं हे डायबेटिजचे प्रमुख लक्षण आहे. टाइप 1 आणि टाइप 2 डायबेटिज रुग्णांना सारखी लघवीला होण्याची समस्या जाणवते. जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा शरीर लघवीद्वारे शरीरातील अतिरिक्त साखर बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काही रुग्णांना सारखी लघवीला होते.

ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम :

ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर सिंड्रोम हा लघवी संबंधित एक आजार असून ज्यात व्यक्तीला अचानकपणे सारखी लघवीला होते. यामुळे काहीजणांना लघवी कंट्रोल करणे कठीण होते. महिलांमध्ये यीस्ट किंवा बॅक्टेरियल इंफेक्शनच्या कारणाने ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडरचू समस्या होऊ शकते. अशी लक्षण जाणवल्यास तुम्हाला लगेचच डॉक्टरांकडे जायला हवे.

यूरिनरी ट्रॅक इंफेक्शन :

सारखी लघवीला होणं हे यूरिनरी ट्रॅक इंफेक्शन किंवा यूटीआयचे लक्षण असू शकते. हे एक प्रकारचे ब्लॅडर इंफेक्शन असून जे कोलाई बॅक्टेरियामुळे होते. यादरम्यान लघवी करताना जळजळ होणे अशी समस्या देखील जाणवते.

वाढलेलं प्रोस्टेट :

पुरुषांना जर वारंवार लघवीला जाण्याची समस्या होत असेल तर याच कारण वाढलेलं प्रोस्टेट असू शकतं. जेव्हा प्रोस्टेट वाढत तेव्हा यूरिनरी ट्रॅकवर दबाव पडतो. ज्यामुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे होत नाही आणि त्यामुळे वारंवार लघवी होते. अशास्थितीत खास करून रात्रीच्यावेळी सारखी लघवी होण्याचा त्रास उद्भवतो.

सारखी लघवीला होण्यावर उपाय :

डाळिंबाची साल : वारंवार लघवी होण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही डाळिंबाच्या सालीचा उपयोग करू शकता. डाळिंबाच्या सालीची पेस्ट बनवून त्यात अर्धा किंवा एक चमचा पाणी मिसळून पाणी किंवा दुधात मिसळून सेवन करा.

मेथी : एक चमचा मेथीची पावडर बनवा आणि त्यात एक चमचा मध आणि एक चमचा आल्याची पावडर मिसळून सेवन करा. दिवसातून एकदा याचे सेवन केल्याने आराम मिळू शकतो.

दही : दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे शरीरातील हानिकारक बॅक्टेरियाला नष्ट करण्यास उपयोगी ठरतात. दिवसातून एक ते दोन वाटी दही खाल्ल्याने पचनसंस्था आणि लघवीशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत मिळू शकते.

आवळा : आवळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते, ज्यामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. आवळाच्या सेवनाने ब्लॅडर इंफेक्शन पासून आराम मिळू शकतो, तेव्हा रोज दिवसातून एक किंवा दोन आवळ्याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल.

(सदर माहिती ही इंटरनेटवरून मिळालेल्या मजकुरावर आधारित आहे. त्यामुळे आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.