गुजरातमध्ये हजारो कोटी किंमतीचं 3,300 किलो ड्रग्ज जप्त
पोरबंदर : देशात सध्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडत आहेत. पुण्यापाठोपाठ आता गुजरातमध्ये ड्रग्जचा मोठा साठा नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं पकडला आहे. 3,300 किलो वजनाचं हे हजारो कोटींचं ड्रग्ज आहे. गुजरात एटीएस, एनसीबी आणि तटरक्षक दलानं ही संयुक्त कारवाई केली आहे.भारताच्या इतिहासातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी ड्रग्जची जप्ती आहे.
पुन्हा एकदा सागरी मार्गानेच तस्करी
भारतात किंवा भारतातून होणारी तस्करी ही प्रामुख्याने सागरी मार्गानेच होते, असे अनेकदा आढळून येते. सागरी मार्गानं होणारी ही तस्करी रोखण्यात तपास यंत्रणांना अनेकदा यश मिळालं आहे. बुधवारी देखील अशीच एक तस्करी रोखण्याचं काम यंत्रणांनी केलं आहे. गुजरातच्या पोरबंदरमधून बुधवारी आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा पकडण्यात आला. गुजरात एटीएस आणि कोस्ट गार्डच्या मदतीनं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं तब्बल 3,300 किलो अंमली पदार्थ ताब्यात घेतले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अंमली पदार्थांची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. इराण आणि पाकिस्तानमार्गे भारतात येणाऱ्या अंमली पदार्थांची आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोनं हाणून पाडली आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जमध्ये 3,089 किलो चरस, 158 किलो मेथॅम्फेटामाइन 25 किलो मॉर्फिनचा समावेश आहे. सुमारे 3,300 किलोहून अधिक वजनाचा हा ड्रग्जचा साठा समुद्रमार्गे घेऊन जाणारा एक कंटेनर पोलिसांनी पकडला.
इराणी आणि पाकिस्तानी क्रू सदस्य अटकेत
एटीएस, एनसीबी आणि भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या पोरबंदर येथे एका जहाजातून गुजरातच्या किनाऱ्यावर आणण्यात येत असलेलं 3300 किलो पेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केलं आहे. याप्रकरणी 5 क्रूना अटक करण्यात आली आहे. हे क्रू इराणी आणि पाकिस्तानी असल्याचा संशय आहे.
विमानानं दिली होती माहिती
P8I LRMR या विमानाने दिलेल्या माहितीनुसार भारतीय तटरक्षक दलानं या संशयास्पद जहाजाला थांबवलं. एटीएस, NCB आणि नौदलाची ही सर्वात मोठी संयुक्त कारवाई ठरली आहे. पकडलेल्या बोटी आणि चालक दलासह जप्त करण्यात आलेलं ड्रग्ज हे भारतीय बंदरात कायदा अंमलबजावणी एजन्सीकडं सुपूर्द करण्यात आलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.