Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आयब्रो ठीक करताना तरुणीला सुचली आयडिया; केला असा बिझनेस की वर्षात कमवले 32 कोटी

आयब्रो ठीक करताना तरुणीला सुचली आयडिया; केला असा बिझनेस की वर्षात कमवले 32 कोटी

नवी दिल्ली : बिझनेस सुरू करणं हा लहान मुलांचा खेळ नाही, असं म्हणतात. मात्र, सिडनीत राहणाऱ्या 29 वर्षीय जॉयस वोंगने अगदी बसल्या बसल्या बिझनेस सुरू केला, असं म्हटलं जात आहे. प्रत्येक स्त्रीप्रमाणेच ती देखील एके दिवशी तिच्या भुवया ठीक करत होती.

पण यावेळी असं काही घडलं की तिला एक नवीन बिझनेस आयडिया सुचली. मग काय, महिलेनं असं उत्पादन लॉन्च केलं जे काही वेळातच लोकप्रिय झालं. परिणामी, जॉयस वोंगने एका वर्षातच 4 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 32 कोटी रुपये कमावले. ती सिडनीतील सर्वात तरुण उद्योगपती बनली आहे.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, जॉयस वोंगला लहानपणापासूनच स्वतःचं काहीतरी करण्याची आवड होती. पण त्याआधी तिला तिचा अभ्यास पूर्ण करायचा होता. जॉयसने FEMAIL ला सांगितलं, "माझ्या डोळ्यांच्या भुवयांशी माझं नेहमीच प्रेम-द्वेषाचं नातं होतं. भुवयांभोवती अतिरिक्त त्वचा जमा झाली होती. भुवया बाहेरच्या दिशेने पसरलेल्या दिसायच्या. पापण्या जड व्हायच्या आणि डोळ्यांना थकवा जाणवायचा. यामुळे मी वृद्ध दिसू लागले होते. पूर्वी मी टेप लावायचे, पण तासाभरानंतर ते दिसू लागायचं. यामुळे मला अडचणी येऊ लागल्या. मग एके दिवशी मी माझ्या भुवया ठीक करायचा प्रयत्न करत होते, तेव्हा एक कल्पना आली. हे कायमचं बरं होऊ शकेल असं काहीतरी बनवू असा विचार केला.

म्हणाली, हे शस्त्रक्रियेद्वारे देखील ठीक केलं जाऊ शकतं, परंतु मी एक मॅज‍िक ग्‍लू बनवला, जो चिकटून राहायचा. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या भुवया तुम्हाला हवं तसं ठेवू शकता. जॉयस वोंगने सांगितलं की, मी ते शेअर करताच ते व्हायरल झालं. याची इतकी मागणी होती की त्यामुळे लोकांना त्याची किती गरज आहे हे मला समजलं. मग मी आणि माझ्या मुलीने त्यावर एकत्र काम केलं. परिणामी एका वर्षात आम्ही करोडपती झालो. मॅजिक ग्लू विकून 32 कोटी रुपये कमावले. हा ग्लू हलका आहे आणि अजिबात चिकट नाही. 40+ वयोगटातील महिलांसाठी ही एक उपयोगाची गोष्ट आहे. मॅजिक ग्लू 18 तास व्यवस्थित चिकटून राहतो.

महिलेनं सोशल मीडियापासून सुरुवात केली. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तीन दिवसांत तिचा व्हिडिओ 104 कोटींहून अधिक लोकांनी पाहिला आहे. लोक तिला व्यवसायाच्या नवनवीन कल्पना विचारत असतात. जॉयसचा एकच सल्ला आहे की कोणतीही गोष्ट लहान नसते. जिथे तुम्हाला काहीतरी खास आणि अद्वितीय वाटत असेल, तिथून सुरुवात करा. लोकांच्या समस्या सोडवणारे उपाय नेहमी शोधा. जॉयस झूमवर लोकांना सल्ला देखील देते. .

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.