Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सूर्यघर योजने अंतर्गत 300 युनिटपर्यंत वीज बील माफ!

सूर्यघर योजने अंतर्गत 300 युनिटपर्यंत वीज बील माफ!

मुंबई :  राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम् अर्थसंकल्प मांडण्यास सुरूवात केली. कुसुमाग्रजांच्या कवितेचे वाचन करून अजित पवार यांनी अर्थसंकल्प वाचनाला सुरूवात केली. पहिल्या चार महिन्यांसाठी तरतुद करण्यासाठी हा अंतरीम अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील 11 गड़ किल्ल्यांना जागतिक वारसा मिळण्यासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. तसेच जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

अर्थसंकल्पातील महत्वाचे मुद्दे : - प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 300 युनिटपर्यंत वीज बील

माफ - राज्यात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. राज्याला 8 हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळाला. - नगर विकास साठी 10 हजार कोटी तर सार्वजनिक

बांधकाम खात्यासाठी 19 हजार कोटी रुपये देणार

- 7 हजार 500 किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत.
- राज्यात 18 वस्त्रोद्योग उभारले जाणार

93%

1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे.

वर्सोवा वांद्रे सागरी सेतू पालघर पर्यंत केला जाणार आहे.

मिरकरवाडा बंदर नव्याने करण्यात येतं आहे.

- रत्नागिरी भागवत् बंदरसाठी 300 कोटी रुपयांची तरतूद - हर घर हर नल योजनेअंतर्गत 1 कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट

- महिलांना पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्यासाठी योजना प्रस्तावित

- राज्यात सहा वंदे भारत एक्सेस सुरु आहेत - मिहान प्रकल्पासाठी 10 कोटींचा निधी दिला.

- नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार - लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार
-

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.