Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपच्या बैठकीत जोरदार राडा! अमित शहा 3 मंत्र्यांवर संतापले, 3 मंत्र्यांना काय शिक्षा दिली वाचा

भाजपच्या बैठकीत जोरदार राडा! अमित शहा 3 मंत्र्यांवर संतापले, 3 मंत्र्यांना काय शिक्षा दिली वाचा 

केद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राजस्थानचादौरा केला. यादरम्यान त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात बिकानेर, उदयपूर आणि जयपूर येथे भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या.

बिकानेरमध्ये अमित शहांची आक्रमक वृत्ती पाहायला मिळाली. यावेळी असे काही घडले की ते राजस्थान सरकारच्या 3 मंत्र्यांवर चिडले. इतकेच नाही तर संतप्त झालेल्या अमित शहांनी राजस्थानच्या तीन मंत्र्यांना तब्बल ४० मिनिटे स्टेजवर उभे करून ठेवले. त्यानंतर अमित शहा यांनीही तीन मंत्र्यांना वेळेनुसार अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

अमित शहा यांना रागात पाहून राजस्थानचे तिन्ही कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी आश्चर्यचकित झाले. यादरम्यान, अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्री गजेंद्र सिंह खिंवसार, सुमित गोदारा आणि अविनाश गेहलोत यांना त्यांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर न दिल्याबद्दल सर्वांसमोर फटकारले.

अमित शाह यांनी बिकानेरच्या पार्क पॅराडाईज हॉटेलमध्ये सुमारे 40 मिनिटे बैठक घेतली, या बैठकीत अमित शाह यांनी मंत्री गजेंद्र सिंह खिंवसार, सुमित गोदारा यांना घेरले. आणि अविनाश गेहलोत यांना जोरदार फटकारले.

अमित शाह यांनी खिंवसार यांच्यासह दोन्ही नेत्यांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीबाबत विचारले असता, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, यावर अमित शहा म्हणाले, तुम्हाला वेळ देता येत नाही का? एवढेच नाही तर अमित शाह यांनी तिन्ही मंत्र्यांना सुमारे ४० मिनिटे स्टेजवर उभे केले.

शेवटी निघताना शाह यांनी तिघांनाही सांगितले. निश्चित वेळेनुसार संपूर्ण अहवाल तयार करून देण्यास सांगितले, अमित शाह यांनी मंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांना विचारले – तुमच्या क्षेत्रात लोकसभा व्यवस्थापन समिती, कोअर कमिटी आणि इतर समित्या स्थापन झाल्या आहेत की नाही? यावर खिंवसार यांनी उत्तर दिले आणि म्हणाले, लवकरच होणार आहे. यामुळे ते चिडले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.