'तो' भयानक शिकारी ज्यांनी 3 तासात 1400 सिंह अन् 4,482 पक्षी मारले
नवी दिल्ली : स्वातंत्र्यापूर्वी भारत एक संपन्न देश होता. भरपूर शेती, दुध-दुभतं होतं तसंच अनेक जंगली श्वापदं भारतात होती. मात्र संस्थानांमधील राजेमहाराजांनी अनेक जंगली प्राण्यांची शिकार केली. त्यामुळे देशातले वाघ, चित्ते व सिंह अशा जंगली प्राण्यांची संख्या झपाट्यानं कमी झाली.
भारतातील संस्थानिकांकडे अमाप संपत्ती होती. मोठमोठ्या महालात राहणारे हे राजे स्वतःच्या मालकीचे असल्याप्रमाणे जंगलात वन्यजीवांची शिकार करत. त्या काळी वन्यप्राण्यांच्या शिकारीवर बंधनं नव्हती. त्यामुळे देशातले राजे, संस्थानिक पाहुण्यांसह शिकारीला जात असत. इतिहासकार डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिन्स यांनी ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ या त्यांच्या पुस्तकात राजे-महाराजांच्या शिकारीविषयी सविस्तर लिहिलं आहे. ते लिहितात, की स्वातंत्र्यावेळी भारतात 20 हजांरांपेक्षा जास्त सिंह होते. त्यापैकी अनेक सिंह राजा-महाराजांच्या बंदुकीचा निशाणा बनायचे. भरतपूरचे राजे एक उत्तम शिकारी होते. आठ वर्षांचे असतानाच त्यांनी पहिल्यांदा सिंहाची शिकार केली होती. 35 वर्षांपर्यंत त्यांनी इतक्या सिंहांची शिकार केली, की त्यांच्या महालातल्या सगळ्या खोल्यांच्या भिंतींवर त्या सिंहांचं कातडं लावण्यात आलं होतं.
तीन तासांत 4482 पक्ष्यांची शिकार
भरतपूरचे महाराज पाहुण्यांनाही शिकारीवर घेऊन जायचे. शिकारीसाठी त्यांनी एक रोल्स रॉइस कार तयार करून घेतली होती. त्या गाडीचं छत चांदीचं होतं. ती गाडी जंगलातल्या वाटेवरूनही वेगानं जायची. त्यांच्या कार्यकाळात एकदा इतक्या कोंबड्या मारण्यात आल्या, जेवढ्या त्या आधी कधीच मारण्यात आल्या नव्हत्या. व्हॉइसरॉय लॉर्ड हॉर्डिंग यांच्या गौरवाकरता महाराजांनी शिकारीचं आयोजन केलं होतं. त्यात तीन तासांत 4,482 पक्षी मारले होते. प्रिन्स ऑफ वेल्स आणि त्यांचे तरुण एडीसी माउंटबॅटन यांनाही काळ्या चितळाच्या शिकारीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन व्हॉइसरॉय म्हणून भारतात आले.
सर्वांत जास्त सिंहांचा शिकारी
ग्वाल्हेरच्या महाराजांनाही शिकारीची आवड होती. ते खासकरून सिंहाची शिकार करायचे. लापियर आणि कॉलिन्स यांच्या मते, या महाराजांनी त्यांच्या जीवनात 1400 पेक्षा जास्त सिंह मारले आणि निवडक लोकांकरता शिकारीच्या युक्त्यांबाबतचं पुस्तकही लिहिलं होतं. तेंव्हाच्या ग्वाल्हेर संस्थानाचे महाराज माधवराव शिंदे यांनी 1914 मध्ये लॉर्ड चार्ल्स हॉर्डिंग यांना शिकारीसाठी आमंत्रित केलं होतं.
शेवटच्या चित्त्यांची शिकार
छत्तीसगढच्या कोरिया संस्थानचे महाराज रामानुज प्रताप सिंह हेही प्रसिद्ध शिकारी होते. त्यांनी शेकडो सिंह, चित्ते व जंगली डुकरं मारली होती. 1947 साली त्यांनी एकाच वेळी तीन चित्त्यांची शिकार केली होती. असं म्हणतात, की ते भारतातले शेवटचे चित्ते होते. त्यांनंतर भारतात चित्ते दिसले नाहीत.
20 खोल्यांमध्ये ठेवले प्राणी
म्हैसूरचे महाराज शिकारीमध्ये सर्वांत पुढे होते. त्यांची जगभरात ओळख होती. महाराजांचा म्हैसूरचा राजवाडा व्हॉइसरॉय भवनापेक्षा मोठा होता. त्या घरातल्या 20 खोल्यांमध्ये शिकार केलेले आणि नंतर भुसा भरलेले सिंह, चित्ते, हत्ती आणि जंगली म्हशी ठेवल्या होत्या. महाराजांच्या आधीच्या तीन पिढ्यांनी त्या सर्व प्राण्यांची शिकार केली होती.
‘द स्टोरी ऑफ इंडियाज चिताज’ या पुस्तकात दिव्यभानू सिंह लिहितात, की भारतात चित्ते नष्ट होण्यामागे त्यांची शिकार हे प्रमुख कारण होतं. भारतातल्या संस्थानिकांनी, राजे-महाराजांनी त्यांची शिकार केलीच, शिवाय मुघल आणि इंग्रजांनीही त्यांची शिकार केली.
ब्रिटनचे राजे किंग जॉर्ज पंचम 1911 मध्ये जेव्हा दिल्लीत आले, तेव्हा ते 10 दिवस शिकारीला गेले होते. त्यात त्यांनी 39 वाघ, 18 गेंडे, डझनभर जंगली अस्वलं आणि इतर अनेक प्राण्यांची शिकार केली. पास्ट इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, 1900 मध्ये भारतात एक लाखांच्या आसपास वाघ होते, मात्र प्रचंड शिकारीमुळे त्यांची संख्या कमी होत गेली आणि नंतर इतक्या वेगानं कमी झाली, की आता भारतात केवळ 2500 च्या आसपास वाघ शिल्लक आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.