बाळाचे जावळ काढण्यासाठी हसत खेळत सगळे निघाले, पण तो तलाव काळ बनला; अन् ट्रॅक्टर तलावात कोसळला! तब्बल 24 जणांचा मृत्यू!
बाळाचे जावळ काढण्यासाठी हसत खेळत सगळे कुटुंबीय आणि नातेवाईक निघाले खरे पण एका बाळाच्या जावळासाठी सात लहान मुले आणि आठ महिलांसह तब्बल 24 जणांना जीव गमवावा लागला. उत्तर प्रदेशातल्या कासगंज येथील तलाव काळ बनला आणि अनेक नातेवाईकांच्या घरात आक्रोश सुरू झाला.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना उत्तर प्रदेशातल्या कासगंज नजीकच्या पटीयाली दर्या वगंज मार्गावर घडली. एटा जिल्ह्यातील नगलकसा या गावातील तब्बल 52 जण बाळाच्या मुंडन कार्यासाठी निघाले होते. अचानक ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर तलावात कोसळल्याने 52 जणांच्या या ट्रॉलीतील तब्बल 24 जणांना आपला जीव गमवावा लागला.
या घटनेत सात चिमुकल्यांना देखील जीव गमवावा लागला. दरम्यान अजूनही पाच जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अलीगड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र ज्या बाळाचे मुंडन करण्यासाठी हे सारे निघाले होते, ते बाळ देखील सुखरूप आहे की नाही त्याविषयी माहिती मिळाली नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.