रात्रीच्या अंधारात कुत्र्यांवर गोळीबार...20 कुत्र्यांचा मृत्यू
एक व्यक्ती गाडीतून उतरली आणि त्याने कुत्र्यांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. या हल्ल्यात 20 भटक्या कुत्र्यांना आपला जीव गमवावा लागला तर 5 कुत्रे जखमी झाले. तेलंगणातील महबूबनगर जिल्ह्यातील पोनाकल गावातून हे प्रकरण समोर आले आहे. शुक्रवारी सकाळी मेलेली कुत्री पाहिल्यानंतर ही घटना स्थानिकांना समजली. रस्त्याच्या कडेला पाच कुत्रे जखमी अवस्थेत पडले होते. हे पाहून लोकांना धक्काच बसला आणि विश्वासच बसेना की कोणी एकाच वेळी इतक्या कुत्र्यांना कसे गोळ्या घातल्या. यानंतर गावातील लोकांनी या घटनेची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,सध्या कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात येत असून अहवालाची प्रतीक्षा आहे. प्राथमिक तपासात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. Shooting at dogsएका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रात्रीच्या अंधारात एक व्यक्ती कारने येथे आला होता. गाडीतून खाली उतरताच त्याने कुत्र्यांवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. त्याने एकट्याने या सर्व कुत्र्यांना गोळ्या घातल्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तीने आरोपीला ओळखत नसल्याचे सांगितले.
एका वृत्तानुसार, पोलिस अधिकारी अद्याप गुन्ह्यामागील आरोपींचा हेतू शोधू शकले नाहीत. भूतपूरचे पोलिस निरीक्षक एम रामकृष्ण यांनी सांगितले की, ही घटना पहाटे 1.30 ते 2.30 च्या दरम्यान घडली. गावकऱ्यांच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 429 (प्राण्यांना मारणे किंवा अपंग करणे) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या तरतुदी तसेच प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार अडकल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Shooting at dogs सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा होत असून लोक या घटनेचा निषेध करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.