Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगानेमोठ्या आर्थिक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवा- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगानेमोठ्या आर्थिक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवा- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली दि. 22:  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने निवडणूक कालावधती संबंधित यंत्रणांनी बँकेतील खात्यावरून होणाऱ्या मोठ्या आर्थिक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवावे. तसेच रेल्वे पार्सल, कुरिअर, चेक पोस्ट आदी ठिकाणी सुक्ष्म तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने खर्च नियंत्रण करणे व खर्च संवेदनशिल भागांमध्ये करावयाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने संबंधित नोडल अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी हॉल येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. 

बैठकीस पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अप्पर आयकर आयुक्त पियुश सिन्हा, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता सावंत-शिंदे, जिल्हा परिषद मुख्य वित्त व लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण, राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक बजरंग पाटील, उप आयुक्त जीएसटी अतुल औंधकर, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल, जिल्हा कोषागार अधिकारी रमेश लिधडे, राज्यकर उपायुक्त सुनिल कानगुडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्य्वस्थापवक विश्वास वेताळ आदी उपस्थित होते.  

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आयकर, पोलीस, बँक, जीएसटी, राज्य उत्पादन शुल्क, आरटीओ आदी यंत्रणांनी समन्वयाने काम करून संबंधित यंत्रणाबरोबर माहितीची देवाणघेवाण करावी. खर्च संवेदनशिल भागांमध्ये फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम्स, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम्स आदी नियुक्त पथकांमार्फत 24x7 निगराणी ठेवावी. निवडणूक कालावधीत कायदेशीर आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. 

उत्पादन शुल्क, जीएसटी, आयकर विभागांनी केलेल्या कारवाईची अनुषंगाने पोलीस प्रशासनास अवगत करावे. तसेच कारवाईबाबत सर्व विभागांनी आपआपसात समन्वय ठेवावा, अशी सूचना पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी केली. या बैठकीसाठी दूरदृष्यप्रणालीव्दारे उपविभागीय अधिकारी मिरज, कडेगाव, विटा, जत तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.