Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्याहून शेगावला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; 18 प्रवासी जखमी, आठ जणांची प्रकृती गंभीर

पुण्याहून शेगावला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; 18 प्रवासी जखमी, आठ जणांची प्रकृती गंभीर

बुलढाणा : पुण्याहून शेगावला येणाऱ्या परिवहन महामंडळाच्या शयनयान बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा  जिल्ह्यातील चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर आज शुक्रवारी (9 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात बसमधील 18 प्रवाशी जखमी तर आठ प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याची प्रथमिक माहिती सामोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

जखमींमध्ये 8 प्रवाशांची प्रकृती गंभीर

शुक्रवारी पहाटे बस चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केले. मात्र ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात ही भरधाव बस ट्रकवर जाऊन धडकली. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून 20 ते 22 प्रवासी प्रवास करीत होते. जखमींवर चिखली आणि बुलढाणा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. हा अपघात इतका भीषण होता की त्यात बसचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात आद्यप कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र जखमींमध्ये 8 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याचे देखील बोलले जात आहे.

बुलढाण्यात साकारणार 'भक्तिमार्ग'

नागपूरमुंबई समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या जिल्ह्यातील अनेक स्थळांना जोडण्याच्या प्रकल्पाला राज्य सरकार गती देताना दिसत आहे. अशातच बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव असा 109 किलोमीटरचा भक्तिमार्ग तयार करण्याच्या निर्णयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तिमार्ग बुलढाणा जिल्ह्यात तयार होणार आहे. हा महामार्ग ग्रीन कॉरिडोर असणार आहे. यामुळे शेगाव हे समृद्धी महामार्गावरून जोडल्या जाणार आहे. या महामार्गाचे काम एमएसआरडीसी करणार असल्याची माहिती मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाला धार्मिक केंद्राशी जोडणारा हा भक्तिमार्ग असणार आहे.


भक्ती मार्गाची वैशिष्ट्ये

हा महामार्ग 109 किलोमीटरचा असेल. जिल्ह्यातील पाच तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हा ग्रीनफिल्ड महामार्ग असे हा महामार्गामुळे शेगाव हे तीर्थक्षेत्र समृद्धी महामार्गाला जोडल्या जाईल. ऐतिहासिक स्थळाला धार्मिक केंद्राची जोडल्यामुळे या महामार्गाचे नाव भक्तिमार्ग ठेवण्यात आल आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.