मनोज जरांगे यांची 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सगेसोयर्यांची व्याख्या स्पष्ट करून कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्राण गेला तरी मागे हटणार नाही. एका जिवापेक्षा करोडो जीव महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले आहेत. या आंदोलनास पाठिंबा म्हणून मराठा समाजाने सरकारच्या निषेधार्थ 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
हरिभाऊ राठोडांनाही भेट नाकारली
जरांगे पाटलांना पाठिंबा देत मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, अशी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांची भूमिका आहे. त्यामुळे आज ते जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला आले होते. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव जरांगेंनी भेट नाकारली. मात्र, सरपंच पांडुरंग तारख व इतरांशी चर्चा करून राठोड यांनी जरांगे यांना शुभेच्छा दिल्या.
50 विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू
शनिवारपासून आंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला फेलोशिपपासून वंचित 50 विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आहे. फेलोशिप मिळावी, या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे आज रविवार, 11 पासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा सहभाग आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.