Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खुश खबर! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती

खुश खबर! आयकर विभागात 12 हजार पदांची भरती


देशातील नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आयकर विभागात लवकरच हजारो पदांची भरती केली जाणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजेच सीबीडीटीचे प्रमुख नितिन गुप्ता यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

ग्रुप 'सी'ची पदे

आयकर विभागाअंतर्गत 10 ते 12 हजार कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. ही पदे प्रामुख्याने ग्रुप सी श्रेणीतील आहेत. ही पदे भरण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. सध्या आयकर विभागात कर्मचारी संख्या साधारण 55 हजारांच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले.

इनकम टॅक्स पोर्टल बंद

तुम्हाला आयकरशी संबंधित कोणते काम इनकम टॅक्स पोर्टलवर करायचे असेल, तर तुम्हाला थोडे थांबावे लागेल. कारण सध्या इनकम टॅक्स पोर्टल सेवा बंद आहे. यामुळे तुम्ही या सेवेचा वापर करु शकत नाही. सध्या इनकम टॅक्सशी संबंधित कोणतेच मोठे काम वेबसाइटवरुन करता येत नाही. वेबसाइटवर सध्या खूप ट्रॅफीक आहे. त्यामुळे वेबसाइट बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मेन्टेनन्ससाठी बंद

इनकम टॅक्सची वेबसाइट देखभालीसाठी बंद ठेवण्यात आली आहे. 3 फेब्रुवारी दुपारी 2 ते 5 फेब्रुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत ही वेबसाइट बंद राहील. तुम्ही इनकम टॅक्सच्या वेबसाइटवर गेलात तर वर कॉर्नरला एक नोटिफिकेशन दिसेल. मेंटेनन्ससाठी वेबसाइट बंद, असुविधेसाठी खेद, असे यावर लिहिले आहे.

तर नाही मिळणार रिफंड

रिफंड मिळण्याबाबत टॅक्स पेयर्सना येणाऱ्या अडचणीबाबत सीबीडीटी प्रमुखांनी भाष्य केले आहे. रिफंड अडकण्याची अनेक कारणे आहेत. आयकर रिटर्नच्या आकड्यात तफावर दिसणे, हे एक त्यातील मुख्य कारण आहे. याप्रकरणी आम्ही तपास करत आहोत.सरकारचे पैसे चुकीच्या पद्धतीने जाऊ नयेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अनेकदा बॅंक खात्याची माहिती चुकीची टाकली जाते. अनेकदा बॅंक मर्ज झाल्याने आयएफससी कोड बदलतो. अनेकदा नोकरी बदलल्यावर बॅंकेची शाखा बदलते, यामुळे रिफंड मिळण्यास उशीर होते. अनेकदा तांत्रिक अडचणी येतात, असेही सांगण्यात येत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.