Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खात्यात एक रुपया नसताना देखील तुम्ही काढू शकता 10 हजार रुपये! कसे ते वाचा.

खात्यात एक रुपया नसताना देखील तुम्ही काढू शकता 10 हजार रुपये! कसे ते वाचा.

सरकारच्या माध्यमातून लोकांना अनेक प्रकारचा लाभ दिला जातो. अनेक योजनांची आखणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली असून त्याचा लोकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. अगदी याच प्रकारचा फायदा हा बँकिंग व्यवस्थेच्या माध्यमातून देखील नागरिकांना होतो.

बऱ्याचदा जीवनामध्ये आपल्याला अचानकपणे पैशांची गरज भासते व आपल्या हातामध्ये पैसा नसतो किंवा आपल्या बँक खात्यात देखील पैसे नसतात. अशावेळी मात्र आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे बँकांकडे पर्सनल लोन किंवा इतर कर्जाच्या मार्गांचा अवलंब केला जातो व लागणारा पैसा उभारला जातो.


परंतु तुम्हाला माहिती आहे का जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्हाला ती पूर्ण करायची असेल तर बँकांच्या माध्यमातून तुम्हाला ओव्हरड्राफ्ट देण्यात येतो. म्हणजे तुमच्या खात्यात एक रुपया नसताना देखील बँकेतून तुम्ही पैसे काढू शकतात. ही पद्धत कशी आहे किंवा अशा प्रकारचे पैसे कोणाला मिळतात? याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.

ओव्हर ड्राफ्टच्या माध्यमातून काढता येईल इतकी रक्कम

तुम्ही जेव्हा कुठल्याही बँकेमध्ये तुमचे बचत खाते उघडायला जातात तेव्हा ती बँक ओव्हरड्राफ्ट सुविधा देते की नाही याची विचारणा करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या व्यक्तींनी जनधन योजनेअंतर्गत खाते उघडलेली आहे त्यांना ओव्हरड्राफ्ट ची सुविधा देण्यात येते.

यामध्ये तुम्ही किमान दहा हजार रुपयांपर्यंतचे रक्कम काढू शकतात. ओव्हरड्राफ्ट हा कर्जाचा एक प्रकार असून याकरिता बँकेत जाऊन तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज भासत नाही. ही सुविधा ताबडतोब उपलब्ध असते. या अंतर्गत तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकता. परंतु यामध्ये तुम्हाला किती पैसे काढता येतील याबाबत बँकेने काही ठरवलेले असते. यामध्ये महत्त्वाचे असे आहे की कर्ज आणि ओव्हरड्राफ्ट सुविधा यामध्ये बराच मोठा फरक आहे.

अगोदर कर्ज घेतले तर यावर आकारल्या जाणाऱ्या व्याजाची गणना मासिक आधारावर केली जाते तर ओव्हरड्राफ्टमध्ये व्याजाची गणना ही प्रत्येक दिवसाला केली जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ओव्हरड्राफ्टवर तुम्हाला जास्त व्याज द्यावे लागते.

कोणाला मिळतो याचा फायदा?

यामध्ये मूलभूत बचत खात्यात कमीत कमी सहा महिने व्यवस्थित ट्रांजेक्शन होणे गरजेचे असते तेव्हा तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट सहज मिळू शकतो. तसं तुमचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असणे गरजेचे आहे. जनधन खात्यात देखील ही सुविधा उपलब्ध आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सुविधेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय हे किमान 18 ते कमाल 65 वर्षाच्या दरम्यान असावे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.