सांगलीतील Video व्हायरल; छेडछाड करणाऱ्याला महिलेचा इंगा, रणरागिणीने कपडे फाटोस्तोवर मारलं..
सांगली : सांगली जिल्ह्यातील मिरजेत छेडछाड करणाऱ्या एका तरुणाला भर रस्त्यावर महिलेनं चांगलाच चोप दिला असल्याचं समोर आलं आहे. या रणरागिणीने त्या तरुणास कपडे फाटेपर्यंत चोप देऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी त्या तरुणास ताब्यात घेतलं आहे.
मिरज येथील मार्केट परिसरात खाद्य पदार्थ्यांच्या गाड्यावर वासू रोकळे हा तरुण काम करत आहे. वासू रोकळे याने मार्केट परिसरात एका महिलेची छेडछाड काढत होता. संतप्त झालेल्या महिलेनं त्या तरुणास भर मार्केटमध्ये रस्त्यावर चांगलाच इंगा दाखवला. या महिलेनं मार्केटमधील रस्त्यावरून त्याला मारत पोलीस स्टेशनमध्ये आणलं.
मिरज शहर पोलिसांनी सदर तरुणास ताब्यात घेतल असून पुढील चौकशी सुरू आहे. अबला समजून महिलेची छेडछाड करणाऱ्या तरुणाला चोप मिळाला असून महिला अबला नसून सबला असल्याचे चित्र या घटनेमुळे समाजासमोर आल आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.