Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भरधाव कारने बाईकला दिली जोरदार धडक अन्… पाहा थरारक VIDEO

भरधाव कारने बाईकला दिली जोरदार धडक अन्… पाहा थरारक VIDEO

व्यक्तीच्या आयुष्यात कधी कोणती अपघाताची घटना घडेल सांगता येत नाही, त्यामुळे रस्त्याने चालताना किंवा गाडी चालवताना नेहमी सावध असले पाहिजे. विशेषत: ज्या लोकांची घरंच रस्त्यानजीक आहेत, त्यांनी अधिक सावधता बाळगली पाहिजे. कारण एक छोटीशी चूकही तुम्हाला खूप महागात पडू शकते. तसेच रस्त्याने चालताना किंवा रस्त्याच्या कडेला उभे राहताना सावध असणे गरजेचे असते अन्यथा कधी कोणती नियंत्रण सुटलेली गाडी येऊन ठेकून जाईल, हे समजणारसुद्धा नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात सतर्कतेमुळे मुलगा आणि वडिलांचे प्राण वाचतात. अन्यथा काही सेकंद जरी उशीर झाला असता तर दोघेही एका भीषण अपघाताचे बळी ठरले असते.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती आपल्या मुलासह रस्त्याच्या कडेला आपल्या बाईकजवळ उभा आहे, यावेळी अचानक भरधाव वेगाने एक कार आली आणि उभ्या असलेल्या बाईकला जोरात धडक देत पुढे घेऊन गेली. मात्र, सुदैवाने कार येत असल्याचे दिसताच ती व्यक्ती आपल्या मुलाला घेऊन वेळीच तिथून बाजूला होते. अन्यथा एक सेकंद जरी उशीर झाला असता तर बाप लेकाला जीव गमवावा लागला असता. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @crazyclipsonly नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत आणि अपघातातून बचावलेल्या व्यक्तीचे आणि त्याच्या मुलाचे अभिनंदन करत आहेत.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.