Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मासे पकडण्यासाठी मुलाने शोधला भन्नाट जुगाड; प्लास्टिकच्या बाटल्यांचा असा केला वापर, पाहा VIDEO

मासे पकडण्यासाठी मुलाने शोधला भन्नाट जुगाड; प्लास्टिकच्या बाटल्यांचा असा केला वापर, पाहा VIDEO


सोशल मीडियावर रोज वेगवेगळे जुगाड व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोण विटांपासून कुलर बनवतो, तर कधी भंगारातील गोष्टींपासून कार… अशाप्रकारे जुगाडाच्या मदतीने काम तर सोपे होते, शिवाय तुमचा वेळही वाचतो. त्यामुळे लोक काम सोपे होण्यासाठी रोज काही ना काही जुगाड शोधतच असतात. सध्या असाच एक नवा जुगाड व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका मुलाने मासे पकडण्यासाठी असा एक जुगाड केला, ज्यामुळे कमी मेहनतीत मोठ मोठे मासे गळाला लागत आहे. यासाठी त्याने प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या आहे.

या व्हिडीओमध्ये एक मुलगा अनोख्या तंत्राने मासे पकडत आहे. तो मुलगा प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या पाण्यात टाकताना दिसतोय. मासे पकडण्यासाठी या बाटल्यांना त्याने धाग्याच्या मदतीने अन्न बांधले आहे. काही तासांनंतर तो पुन्हा पाण्यात जाऊन प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करतो आणि प्रत्येक बाटलीमध्ये मोठा मासा अडकलेला असतो.


एकाचवेळी अनेक मासे पकडण्यात यश

तुम्हाला माहीतच असेल की, रिकाम्या प्लास्टिकच्या बाटलीची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा कमी असते, त्यामुळे या बाटल्या पाण्यात बुडण्याऐवजी तरंगू लागतात. यावेळी बाटलीवर खाण्यासाठी अन्न बांधले आहे ज्यामुळे मासे त्यात अडकतात, पण प्लास्टिकच्या बाटल्या पाण्याच्या वरच राहतात. अशाप्रकारे प्रत्येक बाटलीला एक एक मासा अडकतो ज्यानंतर तो मुलगा अडकलेले सर्व मासे एकाच वेळी भांड्यात जमा करतो. अशाप्रकारे तो कमी खर्चात कमी वेळेत मासे पकडतो.


हा व्हिडीओ एक्सवरील @TansuYegen या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्यावर शेकडो लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे, स्मार्ट असणे नेहमीच कठोर परिश्रमापेक्षा जास्त असते. दुसऱ्या व्यक्तीने लिहिले आहे, मासेमारीचा हा एक स्मार्ट मार्ग आहे. तिसऱ्याने लिहिले की, हे फिशिंगचे नवीन तंत्र आहे. तर अनेकांनी मुलाला स्मार्ट किड असेही म्हटले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.