Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला, सुसाट कारने दोघांना उडवलं; Video

ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबला, सुसाट कारने दोघांना उडवलं; Video

छत्रपती संभाजीनगर शहरातून एक थरारक घटना समोर आली आहे. कारचालकाने ब्रेक ऐवजी एक्सीलेटर दाबल्याने कार सुसाट वेगाने धावली. काही क्षणातच रस्त्यावरून पायी चालणाऱ्या दोघांना कारने जोरदार धडक दिली. त्यानंतर कार थेट रस्त्याच्या शेजारील असलेल्या हॉटेलात शिरली. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना पुंडलिकनगर परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. 


सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारच्या धडकेत दोघे जखमी झाले आहेत. स्थानिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ देखील (Viral Video) समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पुंडलिकनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक कार उभी होती. कारचालक हा नवीन असल्याने त्याने ब्रेकऐवजी कारचा एक्सीलेटर दाबला.


त्यामुळे क्षणार्धात कार अनियंत्रित झाली. सुसाट वेगात असणाऱ्या कारने रस्त्यावरून पायी चालणाऱ्या दोघांना उडवलं. त्यानंतर कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका हॉटेलात शिरली. घटनेनंतर स्थानिकांनी मदतकार्य करीत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पोलिसांत कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.