Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

औरंगजेबला वरण आवडायचं म्हणून तुरी दिल्या' शाळेतल्या विद्यार्थांचा VIDEO व्हायरल

औरंगजेबला वरण आवडायचं म्हणून तुरी दिल्या' शाळेतल्या विद्यार्थांचा VIDEO व्हायरल

मुंबई : व्हायरल व्हिडीओ असं म्हंटलं की सोशल मीडिया आलंच. सोशल मीडियावर आपल्याला असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतात. जे कधी माहिती देतात तर कधी मनोरंजक असतात. हे असे व्हिडीओ लोक तासन तास पाहात बसतात. ज्यामुळे त्यांचा वेळ कसा जातो हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. शिवाय हे व्हिडीओ पाहताना आपण काही व्हिडीओंना आवर्जून शेअर करतो. तर अनेक लोक यावर आपले मत देखील शेअर करतात. जे कधी कौतुक करतात तर कधी टिका. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे आणि त्याचं कारणही तसंच आहे.

हा शाळेतील विद्याथ्यांसंबंधीत व्हिडीओ आहे. जिथे विद्यार्थांना एक प्रश्न विचारला गेला जो इतिहासाशी संबंधीत आहे. पण मुलांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला आणि त्याचे आपआपल्या परीने अर्थ लावायला सुरुवात केली. तेव्हा मुलांनी त्यांच्या डोक्यात जे उत्तर येतंय ते द्यायला सुरुवात केली. या व्हिडीओत मुलांना विचारण्यात आलं की 'तुरी कोणी कोणाच्या हातावर दिल्या?' हा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधीत आहे.


आग्र्यातून सुटका करून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली, तेव्हा असा शब्द प्रयोग इतिहासात वापरण्यात आला. तुरी देणं म्हणजे एखाद्याला गाफिल ठेऊन त्याची फजिती करणं असा अर्थ होतो. पण तुरी देणं म्हणजे नेमकं काय, हे या मुलांना माहितच नाही किंवा त्यांना हे कधी समजावलं गेलं नाही. ज्यामुळे त्यांचा हा समज झाला आहे.

 

मुलांनी व्हिडीओत काय उत्तरं दिली?

त्यावर एक विद्यार्थी म्हणाला, आदिलशाहने अफजलखानाच्या हातावर तुरी दिल्या. दुसरा म्हणतो की शिवाजी महाराजांकडे तुरी जास्त झाल्या होत्या म्हणून त्यांनी औरंगजेबाला दिल्या. कोण म्हणतंय की, औरंगजेबाला चांगलं वरण आवडत होतं म्हणून त्याला तुरी दिल्या. एक म्हणतोय की महाराष्ट्रात तुरी जास्त झाल्या म्हणून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. ओरंगजेबाने शिवाजी महाराजांना संदेश पाठवला होता, मला तुरी पाहिजेत असंही एकाने उत्तर दिलं. शेवटी एक मुलगी म्हणते की मुरारबाजीने दिलेरखानच्या हातावर तुरी दिल्या. काही मुलांनी या प्रश्नाचं उत्तर तर बरोबर सांगितलं, पण जेव्हा त्यांना का? असा पुढे संदर्भ विचारण्यात आला, तेव्हा मात्र त्यांना उत्तरं देता आली नाही आणि त्यांनी आपली युक्ती लावून उत्तर दिलं.

हा व्हिडीओ शाळेतील शिक्षिकेनंच काढला गेला असावा. असा अंदाजा लावला जात आहे. पण तो कोणत्या हेतूनं काढला गेला हे कळू शकलेलं नाही. पण हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यावर अनेक लोक टीका करत आहेत. शिक्षकांना याचा अर्थ मुलांना समजावून सांगितला नाही, ज्यामुळे मुलांची अशी अवस्थ आहे. असं अनेकांचं म्हणणं आहे. तर कोणी या व्हिडीओला मजेदार पद्धतीनं घेत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं? यात नक्की चुक कुणाची विद्यार्थांची का शिक्षकांची?

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.