Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

शरद मोहोळचा ज्याने केला गेम, त्या विठ्ठल शेलारची घराजवळ काढली वरात, Video

शरद मोहोळचा ज्याने केला गेम, त्या विठ्ठल शेलारची घराजवळ काढली वरात, Video

शरद मोहोळ हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मोहोळ हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घराजवळून वरात काढण्यात आली आहे. पुनावळेमधून पोलिसांनी विठ्ठल शेलारची वरात काढली. याशिवाय पोलिसांनी शेलारची बुलेटप्रुफ स्कॉर्पिओही जप्त केली आहे.

कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पुण्यात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या साथिदारांनी शरद मोहोळ याच्यावर गोळ्या झाडल्या. पाच जानेवारी रोजी घडलेल्या या घटनेत शरद मोहोळ हा गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर त्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

या प्रकरणात अटक केलेला आरोपी विठ्ठल शेलार आणि रामदास मारणे या दोघांची मोहोळच्या हत्येपूर्वी नामदेव कानगुडे याच्यासोबत बैठक झाली होती. त्यावेळी तिथे कोण कोण हजर होते? याचा शोध घ्यायचा असल्यानं सुरुवातील जे सहा आरोपी अटक केले होते त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली. दोन्ही गटाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं सुरुवातीला जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यांच्या कोठडीमध्ये दोन दिवसांची वाढ केली.


कोण आहे विठ्ठल शेलार?

विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यातील बोतरवाडी येथील आहे. यापूर्वी तो पुणे शहरातील गणेश मारणे टोळीसाठी वसुली करत होता. मुळशी येथे दोघांचा जाळून खून केल्यानंतर विठ्ठल शेलारच्या दहशतीचा नवीन अध्याय सुरू झाला. पिंटू मारणे याचा खून केल्यानंतर त्याने स्वतःचे नेटवर्क तयार केले. त्याच्यावर नऊ गंभीर गुन्हे दाखल असून, 2014 मध्ये त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

शरद मोहोळ आणि आरोपी विठ्ठल शेलार यांच्या दोन टोळ्या सहा महिन्यांपूर्वी राधा चौकात आमनेसामने आल्या होत्या. तेव्हा मोहोळ टोळीच्या हल्ल्यात विठ्ठल शेलार थोडक्यात वाचला होता. याच गोष्टीचा बदला घेण्यासाठी शरद मोहोळची हत्या झाल्याचा पुणे पोलिसांचा दावा आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.