Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साधूंच्या जटा खेचल्या, निर्वस्त्र करुन काठीने मारहाण.पालघरसारख कांड, Video

साधूंच्या जटा खेचल्या, निर्वस्त्र करुन काठीने मारहाण.पालघरसारख कांड, Video

मुख्यमंत्र्यांनाथेट टार्गेट केलय. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात शाहजहां शेख सारख्या दहशतवाद्यांना संरक्षण मिळत असं त्यांनी म्हटलं आहे. 'बंगालमध्ये खुलेआम साधुंच्या हत्येचा प्रयत्न होतोय. पश्चिम बंगालमध्ये हिंदू असण अपराध आहे” असं मालवीय म्हणाले आहेत. या व्हिडिओवरुन लोकांनी पुन्हा एकदा ममता सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय.

भाजपा नेत्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसतय की, संतप्त जमाव भगवा कपडे परिधान केलेल्या साधूंचे केस ओढत आहे. साधूंना निर्वस्त्र करुन लाठया, काठ्यांनी मारहाण केली जात आहे. साधू स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच ते दया याचनेची मागणी करत आहेत. पण संतप्त जमाव काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीय. त्यांच्याकडून मारहाण सुरु आहे. पीडित साधूसोबत भगवे कपडे घातलेला आणखी एक व्यक्ती व्हिडिओमध्ये दिसतोय.


घटनेला महाराष्ट्रातील पालघरशी जोडलं

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबद्दल पोलिसांनी अजून अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही. साधूंसोबत झालेल्या या मॉब लिंचिंगच्या घटनेवरुन भाजपा थेट ममता सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपाने या घटनेला महाराष्ट्रातील पालघरशी जोडलं आहे.

पालघरमध्ये काय घडलेलं?

16 एप्रिल 2020 रोजी 72 वर्षीय संत महाराज कल्पवृक्ष गिरी आणि 35 वर्षाचे सुशील गिरी महाराज यांचा संतप्त जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. दोन्ही साधू आपल्या गुरुच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी मुंबईवरुन सूरतला चालले होते. दोन्ही साधूंवर मुल चोरीचा आरोप करत जमावाने त्यांची हत्या केली होती.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.