Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किती भारी! अब्जाधीश उद्योगपती असूनही लोकलमधून प्रवास, VIDEO पाहून तुम्हीही शिकाल अनेक गोष्टी

 किती भारी! अब्जाधीश उद्योगपती असूनही लोकलमधून प्रवास, VIDEO पाहून तुम्हीही शिकाल अनेक गोष्टी



दैनंदिन जीवनातही आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात किंबहुना परिस्थिती आपल्याला खूप काही शिकवून जाते. परंतु अशी अनेक माणसं या जगात आहेत जी अगदी उच्च पदावर आहेत, भरपूर श्रीमंत आहेत तरीही त्यांच्या साध्याच्या जीवनशैलीमुळे आपल्या सारख्या सर्वसामान्यांच्या मनात ते घर करतात.सध्या अशाच एका अब्जाधीश उद्योगपती यांचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. यावेळी त्यांच्या कृतीनं प्रत्येकाची मनं जिंकून घेतली आहेत.सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. यावेळी नेटकऱ्यांनीही त्यांच्या या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. यावेळी त्यांच्या कॅप्शननं सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी ते म्हणाले, ''वेळ वाचवण्यासाठी आणि मुंबईच्या ट्रॅफिकमधून वाचण्यासाठी लोकल ट्रेनचा प्रवास केला आहे. मुंबई ते उल्हासनगर एसी लोकलमधून प्रवास केला आहे. हा प्रवास खूप शिकवणारा होता'' असं ते यावेळी म्हणाले आहेत.

.

निरंजन हिरानंदानी हे नावं रियल इस्टेटमधील खूप मोठं नावं आहे. महागड्या गाड्यांमधून ते नेहमीच प्रवास करतात. परंतु यावेळी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे लोकल ट्रेनमधून प्रवास केला. यावेळी ते प्रवाशांशी गप्पा मारताना दिसले. काल त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. 24 तासात त्यांच्या या व्हिडीओला 21 मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावेळी त्यांच्या या व्हिडीओवर नानाविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

लोकल ट्रेन ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. लोकल नसेल तर मुंबईकरांचे जीवन नक्कीच स्थगित होईल, आपला वेळ वाचण्यासाठी आणि ऑफिस झाल्यावर लवकरच घरी जाण्यासाठी प्रत्येक मुंबईकर लोकलमधून प्रवास करतो मग ती स्लो असो वा फास्ट!


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.