Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सासऱ्याने सूनेवर संशय घेतला पण DNA टेस्ट मध्ये आईचे अफेयर निघाले

सासऱ्याने सूनेवर संशय घेतला पण DNA टेस्ट मध्ये आईचे अफेयर निघाले

सासऱ्याने सूनेवर संशय घेणे किंवा नवऱ्याने बायकोवर संशय घेण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. संशय निर्माण झाल्याने DNA Test ची मागणी हि होत असते. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात सासऱ्याने सूनेवर संशय घेत DNA टेस्टची मागणी केली होती. डीएनए टेस्ट करणार नसेल तर नातवाला संपत्तीत अधिकार मिळणार नाही, असं सासऱ्याने सांगितले.

"सासऱ्याने तिच्या नवऱ्याच्या डोक्यात टाकलं की, त्यांचा मुलगा सूनेच्या विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलाय. जो पर्यंत तुम्ही डीएनए टेस्ट करणार नाही, तो पर्यंत संपत्तीत अधिकार मिळणार नाही" त्यावरुन मुलगा आणि वडिलांमध्ये वादावादी झाली. त्यानंतर पती-पत्नी वेगळे राहू लागले. काही वर्षांनंतर मध्यस्थी झाल्यानंतर मुलगा आणि सून पुन्हा घरी राहायला आले. सासऱ्याने पुन्हा एकदा नातवाच्या डीएनए टेस्टची मागणी केली. त्यानंतर मुलगा आणि सूनेने चर्चा करून DNA Test करण्याचे ठरवले.


DNA टेस्ट निकाल सासऱ्याला अपेक्षित आला नाही. टेस्टमध्ये समजलं की, मुलगा पतीपासूनच झाला आहे. पण पितृक नातेवाईकांशी त्याचा DNA जोडला जात नव्हता. म्हणून सासऱ्याने पुन्हा या महिलेवर आरोप करून परत DNA Test ची मागणी केली.

महिलेवर झालेल्या आरोपानंतर पुन्हा एकदा DNA टेस्ट झाली. दोन चाचण्यांनंतर समजल की, तिचे सासरे निश्चितपणे तिच्या पतीचे वडील होते, परंतु सासऱ्याचा आणि त्यांच्या वडिलांचा DNA जोडला जात नाही आहे. त्यातून सासऱ्याच्या आईचे अफेयर असल्याचे समोर आले. सासऱ्याचे पितृक वडिल कोणीतरी वेगळेच होते. म्हणजे सासऱ्याच्या आईचे विवाहबाह्य संबंध होते. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सासऱ्याची फजिती झाली असून सगळ कुटुंब कोलमडून पडलं आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.