Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

CCTV वर मारला स्प्रे.. ATM गॅस कटरने कापून 41 लाख पळवले !

CCTV वर मारला स्प्रे.. ATM गॅस कटरने कापून 41 लाख पळवले ! 

अमरावती:  जिल्ह्यातील तिवसा व वरुड येथील एसबीआयचे दोन एटीएम चोरट्यांनी गॅस कटरने कापून तोडले. या दोन एटीएममधून चोरट्यांनी एकूण ४१ लाख ४८,६०० रुपये लंपास केले. साेमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

अमरावती ते नागपूर मुख्य मार्गावर तिवसा येथील एसबीआयचे एटीएम चोरट्यांनी मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांच्या आसपास फोडले. यावेळी चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करताच त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरावर स्प्रे मारला. त्यामुळे फुटेजमध्ये चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसू शकले नाहीत. या ठिकाणी एटीएममधून २० लाख ७२,८०० रुपयांची रोख लंपास केली.

या प्रकरणी मंगळवारी रात्री तिवसा ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दुसऱ्या घटनेत वरुड येथील एसबीआयचे एटीएम गॅस कटरनेच कापूस मशीनमधील २० लाख ७५,८०० रुपयांची रोख लंपास केली आहे.

या दोन्ही ठिकाणी चोरी करणारी एकच टोळी असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. चोरी करणाऱ्या टोेळीत ३ ते ४ जण असून त्यांनी पांढऱ्या रंगाचा कारचा वापर केला. दरम्यान, आंतरराज्यीय ही टोळी असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.