Breaking News ! राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढणार, किती वर्षानी वाढणार ? केव्हा होणार निर्णय ?
राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवणेबाबत. खरे तर सदर नोकरदार मंडळी कडून जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून मागणी लावून धरण्यात आली आहे.
सध्या स्थितीला राज्य शासकीय सेवेत असलेल्या सरकारी नोकरदार मंडळीचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे एवढे आहे. तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे आणि देशातील इतर राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत असलेल्या सरकारी नोकरदारांचे सेवानिवृत्तीचे वय देखील वाढवले गेले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या मागणीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. विशेष म्हणजे राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीबाबत सकारात्मकता दाखवली आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवले जाईल असे आश्वासन शिंदे यांनी दिले आहे.
दरम्यान याच संदर्भात महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. महासंघाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी शुक्रवारी त्यांची भेट घेतली असून याबाबत विस्तृत चर्चा झाली आहे. बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी यांनी देखील हजेरी लावली होती. या बैठकीत महासंघाने विविध मागण्यांवर चर्चा केली.यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत प्राधान्यक्रमाने निर्णय घेतला जाईल असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर गांभीर्याने विचार करू असे आश्वासन या बैठकीत दिले आहे. यामुळे आता याबाबत अधिकृत निर्णय केव्हा होतो हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसहित देशातील 25 राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे एवढे आहे. विशेष म्हणजे राज्य शासकीय सेवेत असलेल्या ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील 60 वर्षे करण्यात आले आहे. मात्र राज्यातील अ, ब, क या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षे आहे. त्यामुळे या संबंधित सरकारी नोकरदार मंडळीचे सेवानिवृत्तीचे वय वाढवले पाहिजे अशी मागणी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.