Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सांगली शहरात खळबळ

Breaking News! कॉलेजच्या इमारतीवरुन उडी घेत विद्यार्थिनीने संपवलं जीवन; सांगली शहरात खळबळ


गेल्या काही दिवसांमध्ये तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत चालल्याचं दिसत आहेत. या नैराश्यातून ते टोकाचं पाऊल उचलत आहेत. असाच धक्कादायक प्रकार सांगलीतून समोर आलाय.

काल कुपवाडच्या बामणोली येथे महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरुन 16 वर्षीय विद्यार्थिनीनं उडी घेऊन आत्महत्या केली होती. तर आज मिरजेत भाड्याच्या घरात राहत असलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सांगलीच्या कुपवाड येथील बामणोली मधील एका नामांकित खाजगी महाविद्यालयात या घटना घडल्या आहेत. या घटनांमुळं शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

अल्पवयीन विद्यार्थिनीची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना घडली होती. पालकांंसमोरच तिने शाळेच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतली होती. पालकांसमोरच हा सर्व प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

उपचारादरम्यानच झाला मृत्यू

दुसऱ्या मजल्यावरुन उडी घेतल्यामुळं ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. गंभीर जखमी झाली होती. शाळा प्रशासनाने व तिच्या पालकांनी तिला गंभीर जखमी अवस्थेतच रुग्णालयात दाखल केलं. डोक्याला गंभीर दुखापत आणि अतिरक्तस्त्राव झाल्यानं उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे. अजून या विद्यार्थ्यांनी आत्महत्या का केल्या, हे स्पष्ट झालं नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.