Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजस्थानात काँग्रेस नेत्याच्या घरावर ईडीचा छापा

राजस्थानात काँग्रेस नेत्याच्या घरावर ईडीचा छापा

सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने मंगळवारी राजस्थानमधील माजी मंत्री, काँग्रेस नेते महेश जोशी यांच्या घरावर छापेमारी केली आहे. लजीवन मिशन घोटाळाप्रकरणी जयपूर, दिल्ली आणि गुजरातमधील 10 पथकांनी आज सकाळी 6 वाजता महेश जोशी यांच्यासह अन्य पाच जणांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. ईडीने ज्या ठिकाणी छापेमारी केली त्यामध्ये माजी मंत्री महेश जोशी यांची दोन घरे, पाणीपुरवठा विभागाचे दोन पंत्राटदार आणि दोन अधिकाऱयांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.

ईडीच्या पथकांनी महेश जोशी यांच्या घराची झाडाझडती घेतली. काही फायलीबाबत महेश आणि त्यांच्या कुटुंबातील दोन सदस्यांची चौकशी केली. जलजीवन मिशन घोटाळाप्रकरणी ईडीची पथके गेल्या सहा महिन्यांपासून चौकशी करीत आहेत. तीन वाहनांतून ईडीची टीम पहाटे पाच वाजता महेश जोशी यांच्या रेल्वे स्थानकावरील घरी पोहोचली. ईडीने महेश जोशी, त्यांची पत्नी आणि सून यांची चौकशी केली. ईडी महत्त्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करीत आहेत.

 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.