Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर पोलिस बदल्यांच्या मागर्दशर्क सूचना जाहीरआस्थापनाचे अपर पोलिस महासंचालक सिंघल यांनी पाठवली पत्रे

निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर पोलिस बदल्यांच्या मागर्दशर्क सूचना जाहीरआस्थापनाचे अपर पोलिस महासंचालक सिंघल यांनी पाठवली पत्रे


मुंबई:  यावषीर् होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दिलेल्या सूचनांनुसार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मागर्दशर्क सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आस्थापनाचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने या सूचनांची पत्रे सवर् पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांना बुधवारी पाठवण्यात आली आहेत.

सवर् संबंधित घटक प्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या सूचना, निदेर्शानुसार कायर्वाही करावी असे सिंघल यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दजार्च्या अधिकाऱ्यांच्या बदली, पदस्थापनेबाबत पोलिस अधीक्षक यांच्या स्तरावरील कायर्वाही दि. ९ जानेवारीपयर्त पूणर् करावी. ज्या अधिकाऱ्यांच्याबद्दल अधीक्षकांच्या स्तरावर कारवाई करणे शक्य नसेल त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक यांच्याकडे दि. ९ जानेवारीपयर्त सादर करावेत असेही पत्रात म्हटले आहे. 

परिक्षेत्रीय स्तरावरील बदली, पदस्थापनेबाबतची कारवाई दि. १२ जानेवारीपयर्त पूणर् करावी. त्यांच्या स्तरावर कायर्वाही करणे शक्य नसेल तसेच परिक्षेत्रामध्ये सामावून घेणे शक्य नसेल त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पोलिस आस्थापना मंडळ क्र. २ यांच्या कायार्लयास पाठवावेत. तसेच ज्या उपविभागीय अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक यांची बदली करणे आवश्यक आहे त्या पोलिस अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पोलिस आस्थापना मंडळ क्र. १ यांच्या कायार्लयास पाठवावेत असेही या पत्रात म्हटले आहे.  

पोलिस आयुक्त स्तरावरील बदली, पदस्थापनेबाबत दि. १२ जानेवारीपयर्त कायर्वाही करावी. तसेच ज्यांच्यावर कायर्वाही करणे शक्य नसेल त्यांचे प्रस्ताव पोलिस आस्थापना मंडळ क्र. १, २ कडे पाठवावेत. पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या केलेल्या कायर्वाहीचा अहवाल दि. १० जानेवारी, तसेच पोलिस आयुक्त, विशेष महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक यांनी कायर्वाहीचा अहवाल दि. १३ जानेवारीपयर्त ई-आफिस प्रणाली किंवा खास दूतामाफर्त पाठवावेत असेही सिंघल यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.