Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन

अजित उर्फ पापा पाटील यांचे निधन


सांगली येथील प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ आणि मानद वन संरक्षक अजित उर्फ पापा पाटील यांचे बुधवार दि. ३ रोजी रात्री दु:खद निधन.  नुकत्याच झालेल्या राज्य पक्षी संमेलनाचे अध्यक्ष असणाऱ्या अजित पाटील यांनी अनेक मोहिमा केल्या होत्या. कृष्णा आणि इंद्रावती मोहिमेतही ते सहभागी होते. 

बाबा आमटे यांचे 'आनंदवन', प्रकाश आमटे यांचे 'हेमलकसा' या प्रकल्पाशी त्यांचा संबंध होता. सांगली जिल्ह्यातील चांदोली व्याघ्र प्रकल्प साठी त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावईआणि. नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अशोक पाटील यांचे ते थोरले बंधू होत.  अंत्यविधी उद्या गुरुवार सकाळी ९ वाजता अमरधाम  सांगली येथे करण्यात येणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.