अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास चार शंकराचार्यांचा विरोध, सोहळ्यास येणार नाही, कारण.
अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारीला होत आहे. २२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा अयोध्येतील मंदिरात करण्यात येणार आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशात जल्लोष साजरा केला जाणार आहे. परंतु या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास चार शंकराचार्यांनी विरोध केला आहे. ते या सोहळ्यास येणार आहे. जगन्नाथ पुरीतील गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती, उत्तराम्नाय ज्योतिष्पीठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येतील सोहळ्यास आपण जाणार नसल्याचे स्पष्ट केले. स्वामी अविमुक्तेश्वरानंद आणि स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.
काय दिले कारण
स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी अयोध्येत न येण्याचे कारण माध्यमांशी बोलतांना सांगितले. ते म्हणाले की, चारही शंकराचार्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास येणार नाही. कारण मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नाही. मंदिर पूर्ण होण्यापूर्वी प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही. हा विधी शास्त्रोक्त नाही. ज्या ठिकाणी शास्त्रीय विधीचे पालन होत नसेल त्या ठिकाणी आम्ही जाणार नाहीत. समारंभात फक्त टाळी वाजवण्यासाठी आम्ही का जावे? हा समारंभ राजकीय आहे. सरकारने याचे राजकीयकरण केले आहे.
पश्चिमाम्नाय द्वारका शारदा पीठचे शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांनी स्पष्ट काही सांगितले नाही. परंतु समारंभात येणार नसल्याचे स्पष्ट केले. दक्षिणाम्नाय श्रृंगेरी पीठाचे शंकराचार्य महा सन्निधानम स्वामी भारती तीर्थ यांनी या शुभ प्रसंगी देशवासियांनी शुभेच्छा देत समारंभाचा आनंद घेण्याचे आवाहन केले. स्वामी भारती तीर्थ आपला सोहळ्यास विरोध नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
वैष्णव संत म्हणतात, सर्व विधीनुसार
वैष्णव संत महंतांनी यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा सर्व विधीनुसार असणार आहे. किष्किंधामधील हनुमान जन्मस्थानावरील महंत विद्यादास यांनी सांगितले की, जगात हजारो मंदिरांमध्ये काम पूर्ण न होताच प्राणप्रतिष्ठा झाली आहे. शास्त्रांमध्ये यासंदर्भात कोणत्याही अटी नाहीत. अध्योध्या पंच पंच रामानंदीय निर्वाणी अखाडा अणीचे महंत धर्म दास म्हणाले की, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्वात आधी शिखर पुजेचा विधान आहे. परंतु या ठिकाणी मूळ आणि जुन्या विग्रहाची पूजा होत आहे. आता फक्त रामलल्ला नवीन मंदिरात जात आहेत. यामुळे वेळ आणि मुहूर्त सर्व शास्त्रानुसार आहे. रामलल्ला आता आपल्या स्थायी निवासात जात आहे. यावर वाद योग्य नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.