Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ब्रेकिंग न्युज ! मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य.

ब्रेकिंग न्युज ! मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य.


मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे.

तर जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 

मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आता मागण्या तर मान्य झाल्या. पण, त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहीत नियम असतात त्याप्रमाणे होत असते. पंरतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, आत्तापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवी प्रकिया पुर्ण केल्यानंतर ही संख्या ५० लाखांच्या वरती जाणार आहे. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो".

वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मनोज जारांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधित करत आहेत. यासाठी सकाळ पासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाजाचा जनसागर लोटला आहे. मनोज जारांगे पाटील काय संबोधित करणार आहे. याकडे मराठा बांधवाचे लक्ष लागून राहिले आहे. तर आता दुपारी उन्हाची तीव्रता वाढू लागली असताना देखील मराठा बांधव मोठ्या उत्साहात घोषणाबाजी देत जरांगे पाटील यांची आतुरतेने वाट पाहत आहे.

आज सरकारच्या शिष्टमंडळासोबतची बैठक संपन्न झाल्यानंर मनोज जरांगे पाटील यांनी बाहेर येऊन सर्व आंदोलकांना शिवाजी चौकात जमा होण्यास सांगितले होते, शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्व मराठा बांधवांशी चर्चा करूनच घेतला जाईल असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं. सर्व मराठा आंदोलक शिवाजी चौकाकडे रवाना झाले आहेत. मनोज जरांगे काही वेळातच जीआर देखील वाचून दाखवणार आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.