Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अनिल बाबर यांची आमदारकी जाणार की राहणार? आज फैसला होणार

अनिल बाबर यांची आमदारकी जाणार की राहणार? आज फैसला होणार 


खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर  हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचे विश्वासू आणि जवळचे मानले जातात. अनिल बाबर यांच्यावर देखील अपात्रतेची टांगती तलवार आहे. अनिल बाबर हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत. महाविकास आघाडीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात खंबीरपणे साथ दिली. त्यामुळे गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून एकनाथ शिंदे यांच्यासोबतच होते. ठाकरे गटाकडून अपात्रतेप्रकरणी जी नावं दिली आहेत त्या यादीत अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर आहे.अनिल बाबर हे 2019 मध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता.आमदार अनिल बाबर चार वेळा आमदार झालेत. 1990, 1999, 2014, 2019 असे चार वेळा ते आमदार राहिलेत. टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. त्यामुळे मतदारसंघात आमदार अनिल बाबर हाच आमचा पक्ष या भावनेने त्याचे कार्यकर्ते काम करताना दिसून येतात.

मंत्री शंभूराजे देसाई यांनी नुकतेच बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बाबर यांच्याविषयी त्यांचे मत व्यक्त केले. तेव्हा ते म्हणाले,"अनिल बाबर हे आमचे मार्गदर्शक आहेत. अनिल भाऊ यांच्याकडे बघून खूप काही शिकता येण्यासारखे आहे. आपले सरकार आल्यावर टेंभूच्या 6 व्या टप्यालामंजुरी द्या अशी अनिल बाबर यांची भूमिका होती. अनिल बाबरच टेंभू योजनेचे शिल्पकार, कुणीही कितीही बोलू द्या,नियमात बसून काम करण्याची अनिल बाबर यांची पद्धत आहे.आम्ही गुवाहटीवरून जाऊन आल्यानंतर ,सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा तिसरा पक्ष मध्ये आला नसता तर सत्तेतला वाटा वाढला नसता आणि अनिल बाबर नक्क्की मंत्री झाले असते."

"टांगा पलटी करून पुन्हा या मतदारसंघातील काही लोक सत्तेत आलेत. 3 पक्षाच्या समितीत विद्यमान आमदारांना मदत करायची हे धोरण ठरलेले आहे.त्यामुळे या मतदारसंघात कोण जर अनिल बाबर यांना नाहक त्रास देत असतील तर समन्वय समितीत आम्ही प्रश्न विचारू आणि त्या पदाधिकारऱ्याचे कान धरायला लावू. अनिल बाबर यांनी माझ्या खात्याकडे काही मागितले नाही.कारण आमच्याकडे काही देण्यासारखे नाही.सरकारीची तिजोरी भरायचे काम आम्ही करू." असंही शंभूराजे देसाई यांनी सांगितलं.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.