Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

१५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख अधीक्षक कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई

१५ हजारांची लाच घेताना भूमी अभिलेख अधीक्षक कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधकची कारवाई


तक्रारदाराच्या बाजूने निर्णय देण्यासाठी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेणारा भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक सुदाम जाधव हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. जाधव याच्या वाहनावरील चालक उदय शेळके यालाही या गुन्ह्यात अटक झाली. सोन्या मारुती चौकातील भूमी अभिलेख कार्यालयात मंगळवारी दुपारी ही कारवाई झाली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केलेल्या व्यक्तीला त्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी जिल्हा अधीक्षक सुनील जाधव यांनी लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर १५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत आर्जदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर उपअधीक्षक सरदार नाळे यांनी मंगळवारी दुपारी सोन्या मारुती चौकातील भूमी अभिलेखच्या कार्यालयात सापळा रचला. यार्वेळी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच घेताना अधीक्षक जाधव आणि त्याच्या वाहनावरील चालक शेळके या दोघांना पथकाने रंगेहाथ अटक केली. वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने भूमी अभिलेख कार्यालयात खळबळ उडाली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.