Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थीनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; पालक व मनसे कार्यकर्त्यांकडून चोप

सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थीनींसोबत शिक्षकाचे गैरवर्तन; पालक व मनसे कार्यकर्त्यांकडून चोप


सागंली : सांगलीतील एका नामांकित शिक्षण संस्थेमध्ये सहावीमध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन  विद्यार्थिनीसोबत विकृत शिक्षकाने अश्लील चाळे केले. सदरचा प्रकार घडल्याबाबतची माहिती  मनसे जिल्हाध्यक्षांना सांगितल्यानंतर मनसे कार्यकर्ते व पीडितेच्या पालकांनी शिक्षकास चोप दिला.

सांगली शहरातील एका शाळेत हा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य केल्याचे घृणास्पद कृत्य घडले होते. सदर मुलीने घाबरून तिच्या सोबत घडलेला प्रकार मैत्रिणींना सांगितला. त्या वेळी अन्य विद्यार्थीनीं सोबत देखील अश्याच प्रकारे गैरवर्तन केल्याचे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले. या प्रकरणी पीडितेच्या पालकांनी मनसे जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांची भेट घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यावर सर्व पालकांना घेऊन ते संबंधित शिक्षण संस्थेमध्ये पोहचले व झालेल्या प्रकारचा जाब विचारला. त्यावेळी पीडित पालकांचा व मनसे कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला त्यांनी त्या विकृत  शिक्षकाला चांगलाच चोप दिला. शिक्षकास निलंबित करण्याची मागणी
पालक व विद्यार्थी भीतीच्या वातावरणात आहेत. 

अश्या विकृतीमुळे शाळेत मुली पाठवायला देखील पालक घाबरत आहेत. जोपर्यंत हा विकृत शिक्षक निलंबित होत नाही. तोवर मुलींना शाळेत पाठवणार नाही असा पवित्रा पालकांनी घेतला होता. या वेळी त्या विकृत शिक्षकाला तत्काळ निलंबित करा; अशी मागणी मनसे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी संस्था चालकांकडे केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी देखील त्या शिक्षकास कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.