Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मराठा आरक्षण निर्णयावर कोल्हापुरात आनंदोत्सव नाही

मराठा आरक्षण निर्णयावर कोल्हापुरात आनंदोत्सव नाही


कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत झालेल्या शासन निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे व आनंदोत्सव साजरा करणे हे योग्य व न्यायाचे ठरणार नाही, अशी भूमिका सकल मराठा समाज, कोल्हापूर यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई (वाशी) येथे मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३ महिन्यांपेक्षा जास्त काळ कोल्हापुरातील सकल मराठा समाज सक्रिय होता व आहे. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे या भूमिकेशी आम्ही आजही ठाम आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या कालच्या वाशीच्या आंदोलनाविषयी मराठ्यांच्या आरक्षणासंदर्भातील सर्व मागण्या मान्य झाल्या अशा बातम्या ऐकिवात व वाचण्यात आल्या. गेल्या दोनवेळा शासनाकडून आरक्षणाची फसगत याचा पूर्वानुभव लक्षात घेता कालचा शासन निर्णय व त्या संदर्भातील कागदपत्रे याचा कोल्हापुरातील ज्येष्ठ विधिज्ञामार्फत अभ्यास होणे अत्यंत आवश्यक आहे. याच्याशिवाय मराठा आरक्षणाबाबत झालेल्या शासन निर्णयावर कोणतीही प्रतिक्रिया देणे व आनंदोत्सव साजरा करणे हे योग्य व न्यायाचे ठरणार नाही, असे सकल मराठा समाज, कोल्हापूरतर्फे सांगण्यात आले. 

आजच्या शासनाकडून अध्यादेशासंदर्भात झालेल्या घोषणा न्यायालयात टिकणार की नाही ? याची आम्ही उद्या रविवारी कोल्हापूर प्रेस क्लब दसरा चौक येथे दुपारी सर्वसमावेशक चर्चा करू आणि त्या चर्चेतून जो निर्णय होईल त्याच्यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे सकल मराठा समाज कोल्हापूर यांनी पत्रकात म्हटले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.