Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुकरमध्ये शिजवलेली डाळ खाल्ल्याने वाढते युरिक अ‍ॅसिड!

कुकरमध्ये शिजवलेली डाळ खाल्ल्याने वाढते युरिक अ‍ॅसिड!

मुंबई : भारतीयांचा संपूर्ण आहार म्हणजे वरण, भात, भाजी आणि पोळी. बऱ्याचदा तर लोक वरण-भातावरही जेवण संपवतात. म्हणजेच वरण आणि भात हे आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहेत. म्हणून हे आपल्या घरात रोज बनतात. म्हणूच बरेच लोक वेळ आणि गॅस वाचवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये डाळी शिजवतात. परंतु प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवणे शरीरासाठी हानिकारक असते.

काही लोकांचे मत आहे की, प्रेशर कुकरमध्ये डाळी शिजवल्याने सांधेदुखी आणि इतर शारीरिक समस्या उद्भवतात. तर काही लोकांच्यामते, डाळी प्रेशर कुकरमध्ये शिजवल्या तरी त्यांचे पोषणमूल्य अबाधित राहते. तज्ञ क्रिश अशोक यांच्यानुसार, या समस्येवर एक उपाय आहे. यासाठी फक्त डाळ कशी शिजवायची याची योग्य पद्धत माहित असायला हवी.

त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी सांगितले की, डाळी उकळल्यावर पाण्यासारखा पातळ पांढरा थर दिसतो. त्याला सॅपोनिन्स म्हणतात आणि या सॅपोनिन्समध्ये यूरिक ऍसिड असते. ज्यामुळे सांधेदुखी होऊ शकते. सॅपोनिन्स हे वनस्पतींमध्ये आढळणारे संयुग आहे. ज्यापासून साबणाच्या फोमसारखा थर तयार होतो.

 

शिवाय कडधान्ये, लाल मांस, मांसाचे अवयव, अल्कोहोल यासारख्या पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते. प्रेशर कुकरमध्ये डाळी शिजवल्याने पाण्याचा पातळ थर बाहेर पडत नाही.मात्र तज्ज्ञ क्रिशच्या मते, सॅपोनिन्स व्यतिरिक्त द्रवामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने असतात. शिवाय, उच्च तापमानात स्वयंपाक केल्याने बहुतेक सॅपोनिन्स नष्ट होतात. त्याऐवजी, क्रिशचा असा विश्वास आहे की कमी प्रमाणात सॅपोनिन्स शरीरासाठी चांगले असतात. कारण त्यात अँटिऑक्सिडेंट असतात, जे कोलेस्टेरॉल रोखतात.

सहा पद्धतीने प्रेशर कुकरमध्ये शिजवा डाळ

प्रेशर कुकरमध्ये डाळी शिजवण्याची एक विशिष्ट पद्धत आहेत. तज्ज्ञांच्या मते, कुकरमध्ये डाळ शिजवल्याने वेळ आणि ऊर्जा वाचते. पौष्टिक मूल्य देखील राखले जाते. डाळ शिजवताना त्यात 1-2 थेंब तेल घाला. याने डाळ व्यवस्थित शिजेल आणि ती मऊसूत होईल. अनेकजण डाळ शिजवताना त्यात मीठ घालतात. मात्र, क्रिशने असे न करण्याचा सल्ला दिला. त्यांनी डाळीमध्ये मीठ स्वयंपाकाच्या शेवटी घालण्यास सांगितले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.