Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सरसकट दुकाने व आस्थापनावर मराठी पाट्या लावण्याबाबत महापालिका आयुक्त सक्रिय..मराठी भाषेला दिले जाणारे दुय्यम स्थान खपवून घेतले जाणार नाही- तानाजी सावंत

सरसकट दुकाने व आस्थापनावर मराठी पाट्या लावण्याबाबत महापालिका आयुक्त सक्रिय..मराठी भाषेला दिले जाणारे दुय्यम स्थान खपवून घेतले जाणार नाही- तानाजी सावंत

आज मराठी पाट्या संदर्भात महापालिका आयुक्त श्री.सुनील पवार व मनसेचे जिल्हा अध्यक्ष तानाजीराव सावंत यांच्यात बैठक झाली. या बैठकीमध्ये सरकारी नियमाची पायमल्ली करणाऱ्या व न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणाऱ्या महापालिका क्षेत्रातील अनेक दुकाने व अस्थापणा ज्यांचे नामफलक मराठी भाषेत नाहीत तसेच मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जात आहे अश्या दुखणे आणि आस्थापना वर कायदेशीर कारवाई करण्याविषयी साखरात्मक चर्चा झाली आहे.

याबाबत आयुक्त यांनी उद्या पासूनच मोहीम राबवणार असल्याचे सांगून ज्या आस्थापना आणि दुकानावर मराठी भाषेतील नामफलक नाहीत व मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले आहे अश्या व्यावसायिकांना नोटीस बजावून कायदेशीर, दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. 

यावेळी तानाजीराव सावंत यांनी आयुक्तांच्या निर्णयाचे स्वागत केले असून ते म्हणाले मराठी पाट्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वारंवार पाठपुरावा करत आहे. या विषयी मागील काही दिवसांपूर्वी आम्ही आंदोलन देखील केले होते. परंतु काही व्यावसायिक मराठी भाषेचा जाणीवपूर्वक अवमान करत आहेत. प्रादेशिक भाषा व प्रांतरचना आपल्या देशात करण्यात आली आहे मग प्रादेशिक अस्मिता टिकवायची व जपायची जबाबदारी कोणाची? भारत देशाला प्राचीन काळापासून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. जगाच्या इतिहासात भारतीय संस्कृतीला मनाचे स्थान प्राप्त झाले आहे. भारत देश हा विविध भाषा आणि संस्कृतीने नटलेला आहे. 

त्याच विविध भाषयांमध्ये अग्रस्थानी असलेली मराठी भाषा व संस्कृती ही जगभरात ओळखली जाते परंतु खेदजनक बाब ही आहे की आपल्याच महाराष्ट्रात मराठी भाषेला दुय्यम स्थान दिले जत आहे. काही व्यावसायिकांना मराठी भाषेत नामफलक लावायला कमीपणा वाटत आहे आणि आहे आम्हाला कधीही मान्य नाही महारातष्ट्रात मराठी भाषेला प्रथम स्थान मिळालेच पाहिजे. कायदेशीर कारवाई करून देखील जर सरसकट दुकाने व अस्थापणाचे मराठी भाषेत नामफलक झाले नाहीत तर मात्र अश्या व्यावसायिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोष्याला सामोरे जावे लागेल. यावेळी दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमर औरादे, अनिकेत कुंभार व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.