Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचं स्पष्टीकरण

पेट्रोल पंप बंद राहणार नाहीत, अफवांवर विश्वास ठेऊ नका; पेट्रोल-डिझेल असोसिएशनचं स्पष्टीकरण


मुंबई : राज्यभरात उद्यापासून पेट्रोल पंप चालक संप करणार असून त्यामुळं पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळं आपल्या वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी पंपावर ठिकठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे
यापार्श्वभूमीवर आता पुणे पेट्रोल-डिझेल असोसिशनं प्रसिद्धी पत्रक काढून स्पष्टीकरण दिलं आहे. संपाचा किंवा पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा संघटनेचा कुठलीही योजना नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

राज्यभरात अफवा

राज्याच्या विविध भागात पसरलेल्या या अफवेमुळं पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं पेट्रोल पंपवर वाहनांची एकच गर्दी झाली आहे. आज सरकारच्या नवीन कायद्या विरोधात ट्रक चालकांच्या आंदोलनाचा परिणाम दिसून आला. नागपूरात शहरातील पेट्रोल पंपांवर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी झुंबड झाल्याचं पाहायला मिळालं. एरव्ही पेट्रोल पंपावर दोन-चार वाहनं असताना आज मात्र पेट्रोल पंपावर एकच गर्दी पाहायला मिळत आहे.

संघटनेचं स्पष्टीकरण

दरम्यान, पुण्यातील पेट्रोल-डिझेल असोसिएशननं यासंदर्भात एक प्रसिद्धीपत्रक काढून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पत्रकात म्हटलं की, सर्वसामान्य जनतेला आमची विनंती आहे की, कुठल्याही अफवांमुळं किंवा बातम्यांमुळं पॅनिक होऊ नका. जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी संघठना बांधील आहे, असं पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.