Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ह्दय विकाराच्या धक्क्याने न्यायालयीन डयूटीवरील जमादाराचा मृत्यू

ह्दय विकाराच्या धक्क्याने न्यायालयीन डयूटीवरील जमादाराचा मृत्यू


कासारवडवली पोलिस ठाण्याचे जमादार सुनिल रघुनाथ खैरे (५४, रा. कोपरी, ठाणे) यांचा ठाणे ह्दयविकाराचा झटका आल्याने बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी, २६ वर्षीय मुलगा आणि २३ वर्षीय मुलगी असा परिवार आहे.


कासारवडवली पोलिस ठाण्यात न्यायालयीन कामकाजासाठी पैरवी अधिकारी म्हणून खैरे हे कार्यरत होते. बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ठाणे जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वाराजवळच त्यांना अचानक चक्कर आली. त्यांना काही पाेलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने चरईतील डॉ. कुंबळा यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घाेषित केले. उत्तरीय तपासणीसाठी त्यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. एका कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू अधिकाऱ्याला गमविल्याची भावना कासारवडवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांनी  व्यक्त केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.