Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत दुचाकी चोरट्याला अटक


सांगलीत दुचाकी चोरट्याला अटक


सांगली :  सांगली शहरातून विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्यास अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाखांच्या चोरीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

हर्षवर्धन रमेश वाघमारे (वय २१, रा. नवीन वसाहत, सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. दुचाकी चोरट्यांना पक़ण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे एक विशेष पथक तयार केले होते. पथक चोरट्यांचा शोध घेत असताना इस्लामपूर रस्त्यावरील समडोळी फाटा येथे एक तरूण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला.

समडोळी फाटा येथे एक तरूण दुचाकी घेऊन संशायास्पदरित्या थांबल्याचे पथकाला दिसले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केल्यानंतर त्याने ती चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने दोन दुचाकी चोर चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीच्या दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याला सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, अमोल लोहार, अमर नरळे, बाबासाहेब माने, सोमनाथ गुंडे, सोमनाथ पतंगे, अजय बेंदरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.