Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्यानेच केली युवतीची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार

लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्यानेच केली युवतीची फसवणूक; पुण्यातील धक्कादायक प्रकार


पुणे : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीची पोलीस अधिकाऱ्यानेच फसवणूक  केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित युवतीकडून महागड्या वस्तू व गिफ्ट घेत आरोपीने लग्नाचे आमिष दाखवले. तसेच आरोपीच्या पत्नीने युवतीला जातिवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या पत्नीवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यानेच युवतीची फसवणूक  केल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत पुण्यातील बाणेर या ठिकाणी राहणाऱ्या 32 वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. यावरुन पोलीस उपनिरीक्षक युवराज वामन शिंदे व त्याच्या पत्नीवर आयपीसी 376, 323, 504, 506, 34 सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 10 जुलै 2023 ते 4 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये सातारा रोडवरील लॉज, मार्केट यार्ड परिसरातील हॉटेलमध्ये घडला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज शिंदे मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पीडित युवती आणि युवराज शिंदे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला आणि महागड्या भेटवस्तु घेतल्या. तसेच तिला पुणे शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तिच्यासोबत बोलणे टाळले. तसेच आरोपीच्या पत्नीने पीडित युवतीला जातिवाचक शिवीगाळ केली. तसेच तिच्या अंगावर धाऊन जात मारहाण केल्याचे देखील फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.

या घडलेल्या प्रकाराबाबत पीडित तरुणीने 3 जानेवारी रोजी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. मात्र गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे पोलिसांनी गुन्हा स्वारगेट पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.