Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस निरीक्षकाची केवायसीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

पोलीस निरीक्षकाची केवायसीच्या नावाने ऑनलाईन फसवणूक


मुंबई :  केवायसी अपडेटबाबत बँकेतून कधीच विचारणा होत नाही असे वारंवार बँकेसह पोलिसांकडून सांगण्यात येत असताना अज्ञात सायबर ठगाने मुंबई पोलीस दलातील एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्याला केवायसी अपडेटच्या नावाने सुमारे पाच लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खेरवाडी पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. चेंबूर येथे राहणारे तक्रारदार पोलीस निरीक्षक असून ३ जानेवारीला त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन केवायसी अपडेट करा, नाहीतर त्यांचे बँक खाते बंद होईल असे सांगितले. त्याने पाठवलेल्या अॅपमधून केवायसी अपडेट करण्यासाठी डेबीट कार्डसह इतर माहिती अपलोड करताच त्यांच्या बँक खात्यातून दोन ऑनलाईन व्यवहार होऊन सुमारे पाच लाख रुपये डेबीट झाले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.