Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

बेकायदेशीर गोटा करून जनावरे पालन ,अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ४ जनावरे कोडवड्यात

बेकायदेशीर गोटा करून  जनावरे पालन ,अस्वच्छतेमुळे नागरिकांना त्रास होत असल्याने ४ जनावरे कोडवड्यात


महापालिकाच्या  आरोग्य विभागाने  मिरज नदी वेस येथील श्रीमती बेबी कवलगी यांनी सदरच्या परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याने आणि बेकायदेशीर  गोटा  निर्माण करून  जनावरांचे पालन करत होत्या. परिसरातील अस्वच्छता आणि दुर्गंधी बाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत,  सूचना ,नोटीस देऊन ही श्रीमती कवलगी यांनी परिसर स्वच्छ केला नव्हता , परिसरात कचरा , अन्य टाकाऊ पदार्थ याची साठवण केल्याने  दुर्गंधी पसरून परिसरातील लोकांना त्रास देखील होत होता.

या कारणास्तव महापालिका आरोग्य विभाग कडून  कारवाई करण्यात आली आहे, मनपा वतीने अनेक वेळा श्रीमती कवलगी यांनी केलेली अस्वच्छता  आरोग्य विभागाने  स्वच्छ देखील केली होती, तथापि श्रीमती कवलगी यांनी पुन्हा परिसर अस्वच्छ  केला होता.  

नागरिकांनी तक्रार केल्या वरून  श्रीमती कवलगी याच्या  मालकीची 3 म्हैस एक रेडकू  असे एकूण ४,जनावरे  ताब्यात घेऊन  कोडवड्यात टाकली आहेत . डॉ रवींद्र ताटे ,आरोग्यधिकारी श्री रवी साबळे मेघना कांबळे  स्वच्छता निरीक्षक ,मुकादम , कर्मचारी यांच्या टीमने  सदरची कामगिरी केली आहे. डॉ रवींद्र ताटे यांनी सदरची कार्यवाही या पुढे  चालू ठेवण्यात येणार आहे असे सांगितले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.