Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुण्यात शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बापाचा कुऱ्हाडीने हल्ला; घटनेने खळबळ

पुण्यात शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बापाचा कुऱ्हाडीने हल्ला; घटनेने खळबळ


बापानेच आपल्या 15 वर्षीय मुलीवर घरात कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सकाळी 11.30 च्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागे घडली. तिला जखमी अवस्थेत ससून रुग्णालयात पाठविण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे.

अक्षदा फकिरा दुपारगुड्डे ( वय 15, सध्या रा. वाघोली, मूळ रा. सोलापूर) असे जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे. घरात बाप व मुलगीच होते. तर आई कामासाठी बाहेर गेली होती. बापाने तिच्या डोक्यावर, हातावर व पायावर वार केले. आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणी मुलीच्या काकाच्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कांइगडे यांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.