Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

"हिंदू धर्म पाळू नका, ब्रह्मा-विष्णू-महेशला मानू नका" - मुख्याध्यापकाने दिली विद्यार्थ्यांना शपथ

"हिंदू धर्म पाळू नका, ब्रह्मा-विष्णू-महेशला मानू नका" - मुख्याध्यापकाने दिली विद्यार्थ्यांना शपथ


रायपूर : छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये विद्यार्थ्यांना ब्रह्मा-विष्णू-महेश न मानण्याची आणि हिंदू धर्म न पाळण्याची शपथ घ्यायला लावणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलांचे धर्मांतर करणाऱ्या या मुख्याध्यापकालाही शिक्षण विभागाने निलंबित केले आहे.

त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिलासपूरच्या रतनपूर पोलीस स्टेशन परिसरातील एका सरकारी शाळेत मुख्याध्यापक रतनलाल सरोवर यांनी येथे शिकणाऱ्या मुलांना हिंदू धर्माविरोधात शपथ घ्यायला लावली. अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादिवशीच ही शपथ या मुख्यध्यापकांने घ्यायला लावली.

सरोवरने विद्यार्थ्यांना प्रभू राम आणि कृष्णासह हिंदू धर्मातील कोणत्याही देवतेवर विश्वास न ठेवण्याची शपथ घ्यायला लावली. सरोवरने हिंदू धर्मातील प्रथा आणि परंपरांविरोधात लोकांना भडकवले. रतनलाल सरोवर ज्या मुलांना शपथ देत आहेत ती सर्व अल्पवयीन आहेत. शपथ घेणाऱ्यांमध्ये काही प्रौढही दिसतात.

दि. २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत राम मंदिरात रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या दिवशी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मुख्यध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. त्यासोबतच त्याला पोलिसांनी अटक देखील केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.