Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली; शाळेतून परतत असताना दोन सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! अपघातात एकीचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

सांगली;  शाळेतून परतत असताना दोन सख्ख्या बहिणींवर काळाचा घाला! अपघातात एकीचा मृत्यू तर एक गंभीर जखमी


सागंली : सांगली जिल्ह्यातील  जत तालुक्यात  दोन बहिणींच्या अपघातामुळे  एकच खळबळ व्यक्त केली जातेय. शुक्रवार 5 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास दोन शाळकरी सख्ख्या बहिणींना भरधाव कारने धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यामध्ये एकीचा मृत्यू झाला तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली. या घटनेने उमदी, उटगी परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. 

या दोन्ही बहिणी उमदी मधील समता नगर येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षण घेत होत्या. इयत्ता चौथी आणि इयत्ता दुसरीत या बहिणी शिकत होत्या. अपघात झाल्यानंतर दोघींनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यामध्ये श्रावणी उमेश लिगाडे वय 10 हिचा उपचारादम्यान मृत्यू झाला. तर तिची लहान बहिण श्रद्धा उमेश लिगाडे वय 8 वर्ष ही जखमी झाली आहे. . या दोघीही उटगी येथील रहिवाशी असून, त्या प्राथमिक शिक्षक उमेश लिगाडे यांच्या मुली आहेत. 

नेमकं काय घडलं?

उमदी येथील डेफोडीयल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये या मुली शिकत होत्या. शाळा सुटल्यानंतर श्रावणी लिगाडे आणि श्रध्दा लिगाडे या शाळा सुटल्यानंतर दुपारी तीन वाजताच्या सुमारास उटगी पासुन उमदीकडे काही अंतरावर असलेल्या लिगाडे यांच्या शेताजवळ स्कूल बसमधून उतरत होत्या. स्कूल बसमधून उतरुन आपल्या शेतातील घराकडे जात असताना त्यांचा अपघात झाला. उटगी कडुन उमदीकडे जात असलेल्या भरधाव कारने त्यांना जोरात धडक दिली. यामध्ये दोन्ही बहिणींना गंभीर दुखापत झाली. 

हा अपघात होताच त्यांना तात्काळ उपचाराकरिता त्यांना जत तालुक्यात नेण्यात आले. त्याचवेळी श्रावणीचा मृत्यू झाला तर श्रद्धा ही गंभीर जखमी झालीये. तिला पुढील उपचारांकरिता मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातातील कारचालकाचे नाव मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. त्यामुळे या कारचालकचा अद्यापही काही तपास लागला नसल्याची माहिती देण्यात आलीये. तसेच यामध्ये पोलिसांच्या तपासातून कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.